PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO
कल्याणकारी योजना, गरिबीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ज्या कल्याणकारी, गरिबांसाठीच्या योजना आहेत, त्या योजनांना काँग्रेसने नेहमी कडाडून विरोध केला आहे, असा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच आमच्या सरकारने २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. चार कोटी बेघर लोकांना आम्ही पहिल्यांदाच पक्की घरे देण्याचे काम केले. त्यांना सुरक्षा दिली. आम्ही १२ कोटी गरिबांच्या घरांमध्ये शौचालय बांधून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. जलजीवन मिशनच्या माध्यमातून १२ कोटी घरांत पहिल्यांदा नळाद्वारे पाणी पोहोचवलं. आज देशात जवळपास प्रत्येकाकडे आपलं स्वतःचं बँक खातं आहे. मजूर सुद्धा मोबाइलवर यूपीआयद्वारे पेमेंट करत आहे. गरीब आता स्वतः पुढे जात आहे. देशालाही पुढे नेत आहे. या योजनांचा सर्वात मोठा लाभार्थी आमचे दलित, आदिवासी, मागास, वंचित समूहाचे नागरिक आहेत. महायुती सरकारच्या योजना शोषित-वंचितांची ताकद बनलीय. जे काम १० वर्षात झालं, ते आधी पण होऊ शकत होते. पण काँग्रेसच्या सरकारांची इच्छाच नव्हती. काँग्रेसने प्रत्येक योजना, ज्या कल्याणकारी आहेत, त्या योजनांचा काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे, असा घणाघात मोदींनी केला.
देशातील ८० कोटी लोकांना दरमहा मोफत रेशन पोहोचत आहे. रायगडमधील १८ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. आता मला सांगा, या कामाला कुणाचा विरोध असू शकतो का? गरीबाच्या घरात चूल पेटली तर आपल्याला आनंद होईल की नाही? जर गरिबाचं कल्याण होतं तर आनंद होईल ना? पण काँग्रेस पक्षाला होत नाही. काँग्रेस म्हणतं की, २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर निघालेत त्यांना रेशन का? या लोकांचा खर्च वाढून ते पुन्हा गरिबीत जायला हवेत, असे त्यांना वाटते. महाविकास आघाडीला संधी दिली तर पुन्हा ते हेच करतील, असंही मोदी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.