Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

Assembly Election: राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या कामठीत भाजप विरुद्ध काँग्रेस महाभारत रंगलंय.मात्र कामठीचं राजकीय आणि जातीय समीकरण कसं आहे? कामठीचं मैदान भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसाठी किती सोपं आणि किती अवघड आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कामठीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना चौथ्यांदा मैदानात उतरवलंय. तर काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चुरस वाढवलीय. त्यापार्श्वभुमीवर उद्योग आणि रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत भोयरांनी बावनकुळेंची कोंडी केलीय. तर बावनकुळेंनी मात्र विकासकामांच्या जीवावर विजय आपलाच होण्याचा विश्वास व्यक्त केलाय.

हा मतदारसंघ 2004 पर्यंत काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र 2004 मध्ये बावनकुळेंनी काँग्रेसचा गड भेदला. त्यानंतर बावनकुळेंनी सलग तीन वेळा कामठीतून विजय मिळवला. मात्र 2019 च्या निवडणुकीत बावनकुळेंच्या उमेदवारीला कात्री लावून भाजपने टेकचंद सावरकरांना मैदानात उतरवलं. बावनकुळेंनी सावरकरांना निवडून आणलं. 2019 मधील कामठीच्या मतांचं गणित कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

टेकचंद सावरकर भाजप - 1 लाख 18 हजार 182

सुरेश भोयर - काँग्रेस - 1 लाख 7 हजार 66

11 हजार 116 मतांनी सावरकरांचा विजय

कामठीचं जातीय समीकरण काय आहे ते पाहूयात.

कामठीचं जातीय समीकरण

कुणबी आणि तेली समाज- 60 %

एससी समाज- 18%

एसटी समाज- 6%

मुस्लीम - 10 %

इतर- 6 %

लोकसभा निवडणुकीत कामठीतून काँग्रेस उमेदवार शामकुमार बर्वेंना 17 हजार 534 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने कामठीचा गड भेदण्यासाठी जोर लावलाय.. मात्र 18 टक्के मतदार असलेल्या मुस्लीम समाजाचे 6 उमेदवार निवडणूक लढवत असल्याने बावनकुळेंना मतविभाजनाचा फायदा होऊन ते चौकार मारणार की सुरेश भोयर माजी सहकाऱ्याचा पराभव करून जायंट किलर ठरणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com