Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Maharashtra Marathi News Live Updates : आज गुरुवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मोदींची शिवाजी पार्कात सभा, ठाकरेंची छ.संभाजीनगरमध्ये सभा, विधानसभा निवडणुका, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

अमरावतीच्या नागपुरी गेट चौकातून दर्यापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनातून नागपुरी गेट पोलिसांनी पाच कोटींच्या वर सोने व 17 लाखांपर्यंत चांदी असलेले वाहन ताब्यात घेतले आहे. सिक्वेल ग्लोबल प्रेशियस लॉजिस्टिक या कंपनीचे हे वाहन दर्यापूर वरून अकोल्याच्या दिशेने जात असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांकडून देण्यात आली आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात सोने व चांदी नेमके कुठे जात होते या संदर्भातील अधिक तपास नागपुर गेट पोलीस करत आहे. कालच अमरावती शहरात अडीच कोटी रुपयांची रोख दोन वाहनातून पोलिसांनी जप्त केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात रोकड सोन्या-चांदीची वाहतूक होत असल्याचं पुढे येत आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

प्रियंका गांधी पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी

प्रियंका गांधी यांची 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील गांधी मैदान येथे होणार जाहीर सभा

कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी प्रियंका गांधींची होणार जाहीर सभा होणार आहे.

भारताची कॅनडाकडे अर्श डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी

भारत सरकारने कॅनडाकडे अर्श सिंह गिल उर्फ अर्श डल्ला याच्या प्रत्यापर्णाची मागणी केलीय. अर्श डल्लावर भारतात 50 हून अधिक खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागातील गुन्ह्यांची नोंद आहे.

मीरा भाईंदरमध्ये योगी आदित्यनाथ यांची भव्य सभा

उत्तर प्रदेशचे फायर ब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मीरा-भाईंदर शहरात सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता व आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रचार सभेसाठी ते आले होते. योगी यांचे भाषण ऐकण्यासाठी चाळीस हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दाखवली होती मात्र त्यांनी मीरा-भाईंदरच्या स्थानिक मुद्द्यांवर भाष्य न केल्यामुळे श्रोते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरल्याचे पाहायला मिळाले.

रश्मी शुक्ला प्रकरणी काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

संजय वर्मा यांना पोलीस महासंचालक म्हणून कायम करावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिलाय. रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ शकतं. याप्रकरणी काँग्रेसने हायकोर्टात याचिका दाखल केलीय. निवडणूक आयोगाच्या आदेशाची राज्य सरकारने तंतोतंत पालन करावे. त्याची अंमलबजावणी करावी. रश्मी शुक्ला या निवृत्त आहेत त्यामुळे त्यांना पदावर हटवल्यावरती सक्तीच्या रजेवर पाठवता येणार नाही त्यांना निवृत्त घोषित करावे अशी काँग्रेसची मागणी आहे.

BJP protest in Mumbai : हुसैन दलवाईंविरोधात भाजप आक्रमक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

भाजप युवा मोर्चाकडून हुसैन दलवाईंचा निषेध

भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली निदर्शने

Nawab Malik :  नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा

मलिक यांचा जामीन रद्द करण्याचया याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिलाय. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या कोर्टासमोर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्याचा याचिकेकर्ताचा आरोप आहे.

सिन्नर येथे अजित पवार यांची प्रचार सभा 

सिन्नरचे अजित पवार गटाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची सिन्नरमध्ये सभा आहे. अजित पवार सभास्थळी पोहोचले आहेत.

Maharashtra News Live Updates : नाशिकच्या येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Nashik News Update : नाशिकच्या येवल्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. एका वाहनातून 41 लाखांची रोकड आणि 1 लाख 92 हजार 880 रुपयांची रोकड जप्त केली. पैसे कोणाचे व कुठे जात होते? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छत्रपती संभाजी नगर विमानतळावर आगमन

छत्रपती संभाजीनगर-सध्या 2024 विधानसभेची रणधुमाळी सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थिती राहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले असता त्यांच्यासोबत खासदार रामदास आठवले हे सुद्धा उपस्थिती होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धूत हॉस्पिटल जवळ आज विजयी सभा होत आहे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

Maharashtra News Live Updates : नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

- शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू मतदानाच्या स्लीपा वाटत असताना पैसे वाटपाच्या संशयातून गाडीवर हल्ला

- नाशिक पूर्वचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या गाडीवर हल्ला

- पोलीस घटनास्थळी दाखल पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटला

Mumbai News : जोगेश्वरी राडा प्रकरण: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला अटक

शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे एका शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

खासदार रवींद्र वायकर यांच्या चार महिला कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मातोश्री क्लब बाहेर राडा मध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये चार शिवसैनिकांचा विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणांमध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केली आहे.

Maharashtra News Live Updates : आदित्य ठाकरेंच्या बॅगांची तपासणी

रत्नागिरी - आदित्य ठाकरे यांचं दापोलीत आगमन

हेलिपॅडवर आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी

हेलिकॉप्टर मधील बॅग सेक्शनचीही तपासणी

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी

Maharashtra News Live Updates : भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला

कल्याणध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यलयात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुगल उपाध्याय भाजपचे सोशल मीडिया संयोजक आहेत. उपाध्याय यांच्या कार्यलयात येऊन दोघांनी मारहाण करत केली तोफफोड झाली.

Sharad Pawar News Update : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पक्ष प्रमुख शरद पवार याचा रोड शो आयोजित करण्यात आलाय, मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा या रोड शो ला प्रतिसाद मिळतोय...

Accident नागपूर - सुरत महामार्गावर भीषण अपघात

नागपूर - सुरत महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्याचं समजतेय. अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जळगाववरुन धुळ्याकडे जात असताना अपघात झाला. अपघातामध्ये बस जळून खाक झाली. अपघाताचे नेमके कारण अदयाप अस्पष्ट.

maharashtra politics news : किशनचंद तनवाणी आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार

maharashtra politics news उद्धव ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर किशनचंद तनवाणी आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या तासाभरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील. किशनचंद तनवाणी यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. एबी फॉर्म दिल्यानंतरही निवडणूक लढवण्यास तयार नसल्यामुळे त्यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले.

Nanded accident news today : नांदेड भोकर रस्त्यावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

nanded News नांदेड ते भोकर या रस्त्यावर बारसगांव पाटीजवळ चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. दरम्यान नांदेडहून भोकरकडे निघालेल्या श्रीजया चव्हाण यांना हा अपघात दिसताच त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. नांदेडला संपर्क साधला. खासदार अशोक चव्हाण यांनाही घटनेची माहिती दिली. त्यांच्या कार्यालयाने यंत्रणेशी संपर्क साधून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Raj thackeray News: राज ठाकरे यांच्या मनसेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

Maharashtra News Live Updates : चंद्रपूरमध्ये पेट्रोल पंम्पावर पैशाचं वाटप

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे एका पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैसे वाटप होताना पोलिसांनी धाड घालून पैसे जप्त केले. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

राहुल गांधींचा हल्लबोल, भाजपवर टीका

Sharad Pawar News : शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल - बापूसाहेब पठारे यांचा हल्लाबोल

पोर्शे प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगाव शेरी चे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीच्या सभेत याचा खुलासा केला होता. चक्क सुनील टिंगरे यांनी शरद पवारांनाच नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. ही बाब समोर आल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांच्यावर चहुबाजूने टीका होत होती. त्यानंतर आता वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला आता जनताच जागा दाखवेल असे बापू पठारे म्हणाले.

Beed Latest News : बीडमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्याला बेड्या; बीड शहर पोलिसांनी कारवाई

बीड शहरात हातात तलवार घेऊन फिरत दहशत पसरविणाऱ्या आरोपीला बीड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. शेख अकबर शेख हसन वय 34, रा. कागदी दरवाजा, बीड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Marathi News Live Updates :  निवडणूक आयोगाचे शाळा पुराण संपेना; विभागीय चौकशी करण्याचा प्रशासनाचा आदेश.

Maharashtra Marathi News Live Updates : निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांची माहिती सादर न करणाऱ्या 92 शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार तेहती शाळांवर गुन्हे दाखल होते त्यापैकी बहुतांश शाळा या मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित असून अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांची यादी एकत्र झालीच कशी असा सवाल प्रशासनाने शिक्षण विभागाला केलाय. त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण करणाऱ्यांची विभागीय चौकशी करावी अन्यथा शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. त्यामुळं निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.

MVA News Update : महाविकास आघाडीच्या दोन महत्वाच्या सभा

मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार राहणार उपस्थित

पुणे कँटोमेंट मध्ये रमेश बागवे यांच्यासाठी होणार जाहीर सभा

खडकवासलात सचिन दोडके आणि यांच्यासाठी होणार सभा

कमी फरकाने झाला होता रमेश बागवे यांचा मागील निवडणुकीत पराभव शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मैदानात

संध्याकाळी सहा वाजता काकडे मैदान संविधान चौक येथे होणार सभा

रमेश बागवेन साठी काल घेतली होती प्रताप राम गडी यांनी सभा

Pune Latest News : भाजपला धक्का

वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे नगरसेवक रेखा टिंगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश अनेक प्रवेश सध्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होत आहेत

Nagpur Crime News : सोशल मीडिया इन्फ्लून्सरवर पोलिसांची कारवाई

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीर उर्फ स्टायलो याला चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याच्या प्रकरणात नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra News Live Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपचे नेते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन झां. गेल्या अनेक वर्षांपासून हरिश्चंद्र चव्हाण दुर्धर आजार अशी लढत होते. काल रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर सह सांगली सातारा सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण असे पाच जिल्हे येतात. कोल्हापूर परिक्षेत्रातील ४७ मतदार संघात 36 तपासणी नाके आहेत. तपासणी नाक्यांसह भरारी पथकांनी आचारसंहिता काळात संशयास्पद रोकड, अवैध दारू, गांजा मौल्यवान धातू आणि गुटखा असा सुमारे वीस कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे 24 हजार संशयीतांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक काळात इतर राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावरती परिक्षेत्रात दाखल झाला आहे. तसच पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या वरती कडक कारवाया केला जात असून निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करावे असा आवाहन देखील केलय. तर संवेदनशील मतदार केंद्रांवरती विशेष खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्याचं फुलारी यांनी सांगितले.

Rahul Gandhi Speech Live : उत्तर महाराष्ट्रातील राहुल गांधी यांची आज नंदुरबारमध्ये सभा

Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर येत असून नंदुरबार शहरातील जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानात त्यांची सभा पार पडणार आहे प्रशासनाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन दक्ष असून कोणताही अनुसूचित घटना घडू नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेत असून नंदुरबार जिल्ह्यातील चार आणि धुळे जिल्ह्यातील एक असे एकूण पाच उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी नंदुरबार मध्ये येत असून राहुल गांधींचा हा नंदुरबार जिल्ह्यातील दुसरा दौरा तर उत्तर महाराष्ट्रातील पहिला दौरा असणार आहे राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नाना पटोले. बाळासाहेब थोरात यासोबत काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत राहुल गांधी आपल्या भाषणातून आदिवासी बांधवांना काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Maharashtra News Live Updates : शरद पवारांची भाजप टीका

Maharashtra News Live Updates : सत्तेचे काही गुण दोष असतात , सत्ता केंद्रित झाली की भ्रष्टाचारी होते आणि असं घडू नये म्हणून आम्ही एकत्र आल्याचं सांगतं, शरद पवारांनी महाविकास आघाडी कशी तयार झाली ,याचा राजकीय किस्सा सांगून, भर सभेत महायुतितील नेत्यांची नावं न घेता त्यांचां ,समचार घेतला

भोसरी विधानसभा मतदार संघातील माहविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ पवार बोलत होते ,यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत ,भाजपचा देशाची घटना बदलण्याचा दृष्टिकोन असल्याने 400 पार चां नारा दिल्याचा पुन्हा एकदा उल्लेख करून ,पवारांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली

chatrapati sambhajinagar News live : संभाजीनगरच्या ऑरिकचा विकास होणार कधी?

गुजरातच्या ढोलेरा DMIC मध्ये वेगाने कामे सुरू आहेत, मग संभाजीनगरच्या ऑरिकचा विकास होणार कधी? असा प्रश्न संभाजीनगर शहरातील उद्योजकांनी उपस्थित केलाय. आज होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेतून या प्रश्नांच्या उत्तराची उद्योजकांना अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमधील DMIC तील शेंद्रा बिडकीन इन्व्हेस्टमेंट रिजनच्या विकासाची गती संथ आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काही उद्योजकांनी ट्विटरवर, गुजरातच्या ढोलेरा कॉरिडॉरप्रमाणे ऑरिक, डीएमआयसीचा विकास कधी होणार?' असा प्रश्न उपस्थित करून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारच्या सभेत ठोसपणे सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Maharashtra News Live Updates : शरद पवारांना उत्तर देणार....वळसे-पाटील

शरद पवारांना उत्तर देण्यासाठी वळसे पाटलांनी सांगता सभेची निवड केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी वळसे पाटील काय बोलतील, याकडे लक्ष लगालये. आज बरंच काही बोललं गेलं, यावर आज काही बोलणार नाही. मात्र समारोपाच्या सभेला उत्तर मिळतील, असं म्हणत वळसेपाटीलांनी शरद पवारांच्या टिकेवर भाष्य केलं.

uddhav thackeray speech today live : उद्धव ठाकरे यांची आज श्रीगोंदा येथे येथे भव्य जाहीर सभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अहिल्यानगर मधील श्रीगोंदा येथे जाहीर सभेसाठी येणार आहेत. या ठिकाणी अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी तिकीट विकले गेले आहे अशी चर्चा श्रीगोंदा तालुक्यात होती कारण महाविकास आघाडी कडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांना देण्यात येणार होती मात्र अचानकपणे अजित पवार गटातून रात्रीतून शिवसेनेत आलेल्या अनुराधा नागवडे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी हे तिकीट विकले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता त्यामुळे आता याच श्रीगोंदा मतदार संघात येऊन उद्धव ठाकरे काय बोलणार शिवसेनेतील बंडखोरी बद्दल काय कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News Live Update  :  महापालिका कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती, आजपासून अंमलबजावणी

महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रिय कार्यालय आणि महापालिकेच्या इमारतींच्या आवारात हेल्मेटविना येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत.

तसेच वाहनतळावरही त्यांना वाहने उभी करण्याची परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे. गुरुवारपासून (१४ नोव्हेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या आदेशाकडे दुर्लक्ष करत उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून त्याची नोंद संबधित कर्मचारी, अधिकारी यांच्या सेवापुस्तकातही घेण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या आदेशात देण्यात आला आहे.

Agro Pune Marathi news : हंगाम सुरू होण्यापूर्वी आंबट गोड द्राक्षांची आवक

आंबट गोड चवीच्या द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास अद्याप वेळ आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. बारामती, तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरातून फळ बाजारात दररोज दीड ते दोन टन द्राक्षांची आवक होत आहे.

हंगामपूर्व द्राक्षांचा मागणी चांगली आहे. घाऊक बाजारात नऊ किलोच्या पेटीला प्रतवारीनुसार ९०० ते एक हजार रुपये दर मिळाले आहेत. पाच किलो द्राक्षांच्या छोट्या खोक्यांना प्रतवारीनुसार ६०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत.

Pune news : पुणे पुस्तक महोत्सव १४ डिसेंबरपासून

राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे १४ ते २२ डिसेंबरदरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचे दुसरे वर्ष असून, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात पुणेकरांना पुस्तकांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

Pune Crime News : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहा जणांविरुद्ध गुन्हा

धनकवडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Palghar News : उत्तम पिंपळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती

Maharashtra Marathi News Live Updates : पालघर _ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालघर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती. आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख. तळागळातील जनतेशी नाळ जोडलेल्या पिंपळे यांना ऐन निवडणुकीच्या काळात उपनेते पदाची जबाबदारी दिल्याने पक्षाला जिल्ह्यात चांगला फायदा होईल.

नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी किशोर पाटकर यांची नियुक्ती

शिवसेना शिंदे गटाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी किशोर पाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेय. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी बंडखोरी करत ऐरोली मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत. यामुळे शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे किशोर पाटकर यांची वर्णी जिल्हाध्यक्ष पदावर लागलेय. बेलापूर विधानसभा क्षेत्रात किशोर पाटकर हे जिल्हाध्यक्ष राहणार असून ऐरोली विधानसभेसाठी अद्याप कोणाचीही नियुक्ती नाही करण्यात आलेय.

Maharashtra Marathi News Live Updates : नितीन राऊत थोडक्यात बचावले, अज्ञात ट्रकने दिली धडक

Maharashtra News Live Updates : काँग्रेसचे उत्तर नागपूरचे उमेदवार माजी मंत्री नितीन राऊत यांच्या वाहनाला एका ट्रकने धडक दिल्याची घटना रात्री उशिरा घडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com