Diabetes Treatment
Diabetes Treatment Saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Treatment : तासभर चालल्याने वजन होईल कमी ? मधुमेह देखील राहिल नियंत्रणात, वाचा सविस्तर

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips : वाढते वजन व मधुमेहामुळे आपले जीवन जगणे अशक्य झाले आहे. त्यासाठी आपण नियमित आरोग्याची काळजी घेत असतो. आहारातील बदल, योगा व खाण्यापिण्यावर नियंत्रणात ठेवल्यास आपण या आजारावर आपल्याला मात करता येऊ शकते.

आयुर्वेदानुसार, प्रत्येक आहारानंतर (Food) शतपावली केल्याने पचन आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना दूर होतात. त्यामुळे रोज 10 मिनिटे हळूहळू शतपावली केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

भारतात (India) आयुर्वेदाला अधिक महत्त्व आहे. कोणत्याही आजारावर आयुर्वेदातून सहज मार्ग काढला जातो. वाढते वजन, मधुमेह (Diabetes) व रक्तात वाढणारी साखर यामुळे तुम्ही देखील त्रस्त आहात तर आयुर्वेदातील हा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. त्यामुळे जेवणानंतर आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आपण निदान तासभर तरी शतपावली करायला हवी. जाणून घेऊया त्याचे फायदे

1. पचनक्रिया सुधारतेः

आयुर्वेदानुसार, जेवणानंतर थोडावेळ चालण्याने पाचन अग्निला उत्तेजित होण्यास मदत होते. हे अन्नाचे योग्य पचन करून पोषक तत्त्वांना शोषून घेण्यास मदत करते. त्याचप्रमाणे हे अन्नाला पाचन तंत्राच्या माध्यमातून अधिक वेगाने प्रवाहित करण्यास मदत करते. ज्यामुळे अपचन, सूज येणे, वेदना होण्याची शक्यता कमी करते.

2. मेटाबॉलिक रेट वाढवतेः

चालण्याने तुमचा मेटाबॉलिक रेट वाढण्यास मदत होते ज्यामुळे वजन देखील कमी होते. वाढलेला मेटाबॉलिक अनेक आजारांपासून बचाव करतो.

3. रक्तातील साखर नियंत्रणात राहाते

जेवणानंतर शतपावली रक्तातील साखरेच्या प्रमाणास नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर स्नायूंद्वारे इंधनाच्या स्वरुपात ग्लूकोज वाढवण्यास प्रोत्साहन देते, रक्तातील साखरेची वाढ कमी करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते.

4. कॅलरीज कमी करते

जेवणानंतर दररोज शतपावली केल्याने कॅलरीज कमी होतात आणि शरीर निरोगी राहाते. त्याचबरोबर वजन ही नियंत्रणात राहाते.

5. तणाव कमी करते

चालणे हा एक हलका व्यायाम आहे. जो वजन आणि मधुमेह कमी करण्यास उपायकारक ठरतो. एंडोर्फिन साहाजिकच वाढते. एंडोर्फिनच्या वेदना कमी करणारे हार्मोन म्हणुन देखील ओळखले जाते. याचे उत्पादन पिट्यूटरी ग्लँड्स आणि शरीराच्या इतर भागांत होते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या आनंदी हार्मोन्सना वाढवण्यास मदत करतात. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

6. चांगली झोप

आयुर्वेदानुसार, जेवणानंतर शतपावली केल्याने पचनक्रिया सुरळीत राहाते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामुळे पाचन वेदना कमी होतात आणि शरीराला आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT