
Diabetes Health Tips : जगभरात तापमानाचा पारा वाढत असताना त्यांचा सामना करणे लोकांसाठी खूपच कठीण होत आहे. भारतीय IMD कडून उष्णतेच्या लाटांविषयी दिल्या जाणाऱ्या धोक्याच्या सूचनांमुळे मधुमेहींसाठी काही विशिष्ट प्रकारचे धोके समोर आले आहेत.
मधुमेहाचे व्यवस्थापन ही आधीच एक तारेवरची कसरत असते, पण जेव्हा त्यात प्रचंड उष्म्याची भर पडते तेव्हा आपले आरोग्य (Health) जपण्यासाठी स्वत:हून काही पावले उचलणे अधिकच गरजेचे बनून जाते.
मधुमेह (Diabetes) असलेल्या व्यक्तींनी हवामान व त्याचा बदलता कल यांच्या परिणामांविषयी जागरूक असले पाहिजे, व आपल्या ग्लुकोजच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणे हे त्यांचे प्राधान्य असले पाहिजे. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी, रक्तातील साखरेच्या (Sugar) पातळीवर सतत देखरेख ठेवत राहणे महत्त्वाचे असते, विशेषत: जीवनशैलीतील बदलांमुळे ही पातळी सतत वरखाली होत असेल तर त्याबाबत अधिकच दक्ष राहिले पाहिजे.
1. शरीरातील ग्लुकोजची पातळी कशी कराल चेक ?
FreeStyle Libre सारख्या CGM उपकरणांमुळे सोपे झाले आहे, जी अगदी प्रवासातही आपल्या स्थितीला ताब्यात ठेवण्यासाठी तुम्हाला सुईही न टोचता, एक वेदनारहित उपाय देऊ करतात. तुम्ही या तपासणीतून मिळणाऱ्या आकड्यांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि दररोज दिवसाच्या २४ तासांपैकी किमान १७ तास ग्लुकोजचे प्रमाण इष्टतम पातळीवर ठेवले पाहिजे.
नानावटी मॅक्स सुपर स्पेश्यालिटी हॉस्पिटल, मुंबई येथील सीनिअर कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. गिरीश परमार सांगतात, एक आरोग्यपूर्ण दिनचर्या ही मधुमेहाच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपले दैनंदिन वेळापत्रक पार कोलमडून जाऊ शकते. परिणामी लोकांना त्यांचे मधुमेह डाएट (Diet) जपता येत नाही किंवा ग्लुकोजची पातळी वेळच्यावेळी तपासता येत नाही.
उन्हाळ्यामध्ये, विशेषत: जेव्हा उष्णतेची लाट असते तेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता अधिक असते, विशेषत: रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित असेल तर याची शक्यता अधिकच वाढते. तेव्हा रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्यासाठी योग्य संतुलन राखायचे असेल तर कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (CGM) सह काही उपाययोजना लक्षात ठेवून करायला हव्यात, म्हणजे आपल्या दिनचर्येत आलेल्या अडथळ्यांमुळे मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये व्यत्यय येणार नाही.
याशिवाय आपल्या मधुमेहावर नियंत्रणात ठेवत उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या हे ५ सोपे उपाय:
1. भरपूर द्रवपदार्थ घ्या:
प्रवास आणि घराबाहेर जास्त वेळ घालवणे म्हणजे डिहायड्रेशनला निमंत्रणच. हे टाळण्यासाठी तुम्हाला तहान लागली नसेल तरीही भरपूर पाणी, ताज्या फळांचा रस आणि कॅफिनमुक्त पेयांचे सेवन करून शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवा. तुम्ही शहाळ्याचे पाणी, शुगर-फ्री लेमनेट, लस्सी आणि अशी कितीतरी पेये घेऊ शकता व अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन टाळू शकता.
2. कडक उन्हापासून दूर रहा:
मधुमेह असलेल्या व्यक्ती मात्र खूप वेळ उन्हात राहिल्यास त्यांना उष्णतेमुळे थकवा येण्याचा धोका अधिक असतो. गरगरल्यासारखे वाटणे, घाम येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हृदयाची धडधड वाढणे आणि मळमळणे यांसारख्या लक्षणांकडे लक्ष ठेवा. तुम्हाला यातली कोणतीही लक्षणे सुरू झाल्यासारखे वाटत असेल तर थंड ठिकाणी जा आणि द्रवपदार्थांचे सेवन करा.
3. आपल्या व्यायामाचे नियोजन हुशारीने करा:
आराम हा उन्हाळा सुखात घालवायचा मंत्र आहे हे खरे, पण मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशीरा घराबाहेरचे वर्कआऊट करू शकता. पण जेव्हा उन्हाचा पारा वाढलेला असेल तेव्हा घरातल्या घरात व्यायाम करणे किंवा योगासने करणेच योग्य राहील.
4. योग्य आहार घ्या:
इतरांकडे पाहुणे म्हणून जाताना, तिथले स्ट्रीट फूड किंवा स्थानिक पदार्थ चाखून पाहण्याचा मोह होतो. सुट्टीमध्ये लोकांना नवीन रेस्टॉरंट्समध्ये जावेसे वाटते किंवा वेगवेगळ्या पाकसंस्कृतींमधले पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी मधुमेह असलेल्या व्यक्तींनी संतुलन, सकस आहारपद्धतीचे पालन करण्यासाठी अधिकच दक्षता घेतली पाहिजे आणि आपली ग्लुकोजची पातळी बिघडवतील असे पदार्थ खाण्याचा मोह टाळला पाहिजे.
या काही सूचनांचे पालन करून, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि मधुमेह व्यवस्थापनाची एक सर्वसमावेशक पद्धत अंगिकारून तुम्ही – अगदी उन्हाळ्याच्या मोसमातही, दिवसाच्या किमान ७०% भागात ग्लुकोजची अपेक्षित पातळी राखण्याचे लक्ष्य बाळगू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.