Foods To Control Diabetes: मधुमेहींनो आता शुगर कंट्रोल करणं झाले सोपे ! सकाळी उठल्यावर करा या 6 पदार्थांचे सेवन

Diabetes Diet Tips: बदलती जिवनशैली आणि खाण्यापिण्यात वाढत चाललेलं जंक फूडचं प्रमाण यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे.
Control Diabetes
Control Diabetes Saam Tv

How To Control Diabetes : मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये आपल्याला आहारा पासून व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतात. कोणतीही पदार्थ खाण्याआधि त्यातील साखरेचे प्रमाण पहावे लागते, अन्यथा शूगर लेव्हल वाढण्याची शक्यता असते.

मधुमेही रुग्णांना (Patient) सकाळच्या नाश्त्यापासून आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागते. हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी सकाळी उपाशी पोटी नाश्ता करताना अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करु नये ज्यामुळे त्यांचे ब्लडप्रेशर (Blood Pressure) वाढेल. तज्ज्ञांनुसार मधुमेहींनी उपाशी पोटी फक्त अशाच पदार्थांचे सेवन करावे ज्याचा त्यांना त्रास होणार नाही.

Control Diabetes
Diabetes Control In Summer Season : उन्हाळ्यात शुगर लेव्हल खरेच वाढते का? जाणून घ्या डॉक्टरांकडून, लगेच होईल कंट्रोल

उपाशी पोटी या पदार्थांचे सेवन करावे -

1. जांभळाचा रस -

जांभुळ इंसुलिनच्या उत्पादनात वाढ करते आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. जांभळाच्या रसात फायबर्स असतात ज्यामुळे पचन शक्ती वाढते. तेव्हा मधुमेही (Diabetic) रुग्णांनी जांभळाचा रस उपाशी पोटी घेतल्यास शूगर कंट्रोल करण्यास मदत होते.

2. तेजपत्त्याचे पाणी -

तेजपत्ता हा गरम मसाल्यातील एक पदार्थ आहे जो शरीरात रक्तातील साखरेचा स्थर कमी करण्याचे काम करतो. तेजपत्त्याला रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवून दुसऱ्यादिवशी ते पाणी प्यायल्यास तुमच्या रक्तातील साखरेच्या स्थरातील चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. तुम्ही हवं तर त्या पाण्यापासून हर्बल टी देखील बनवू शकता.

Control Diabetes
Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

3. मेथीचे पाणी -

मधुमेही रुग्णांनी सकाळी उपाशी पोटी मेथीचे पाणी पीणे त्यांच्या आरोग्यासाठी गुणकारक ठरते. त्यामुळे दररोज रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उपाशी पोटी मेथीच्या दाण्यांबरोबर घेतल्यास उपायकारक ठरेल.

4. मोड आलेली मेथी -

मोड आलेली मेथी साखर कमी करण्यासाठी कायमचं उपायकारक मानली जाते. यातील फायबर्स रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर हे रकेतातील साखर वाढण्यास थांबवते व मधुमेहास आळा घालण्यास मदत करते. याशिवाय पचनक्रीया सुधारते आणि बध्धकोष्टतेसारख्या सारख्या समस्येवर हि उपायकारक ठरते. मोड आलेली मेथी तुम्ही सलाडमध्ये किंवा लिंबू आणि मिठासोबतही खाऊ शकता.

Control Diabetes
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री झोपण्याआधी करा 5 गोष्टी

5. कढीपत्ता -

कढीपत्ता इंसुलिनला कार्यशील बनवते आणि साखरेला पचवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहींनी सकाळी उपशी पोटी कढीपत्त्याची पाने खाल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

6. पपई -

पपईत फायबर्स असल्यामुळे पचनक्रीया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी पपई फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com