Bhindi For Diabetes : उच्च रक्तदाब व मधुमेहावर फायदेशीर ठरेल भेंडी; कसे कराल सेवन? जाणून घ्या

How To Control High Blood Pressure : उच्च रक्तदाब व मधुमेह हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
Bhindi For Diabetes
Bhindi For DiabetesSaam Tv

Diabetes Tips : उच्च रक्तदाब व मधुमेह हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते कारण येथे मधुमेह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मधुमेहाच्या आजारावर अद्यापह कोणतेही औषध निघालेले नाही.

मधुमेह (Diabetes) किंवा उच्च रक्त शर्करा नियंत्रित करण्यात खाण्यापिण्याची सर्वात मोठी भूमिका असते. डॉक्टरांच्या मते , निरोगी आहार (Food) आणि सक्रिय जीवनशैलीद्वारेच मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो.

Bhindi For Diabetes
Foods To Control Diabetes: मधुमेहींनो आता शुगर कंट्रोल करणं झाले सोपे ! सकाळी उठल्यावर करा या 6 पदार्थांचे सेवन

अशी अनेक फळे (Fruit) आणि भाज्या आहेत, ज्या साखरेच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत आणि त्या खाल्ल्याने मधुमेहाची लक्षणे नियंत्रणात राहतात. त्यातील एक भेंडी. भेंडी ही मधुमेही रुग्णांसाठी टॉनिक समजले जाते. यामुळे साखरेची अनियंत्रित पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कसे ते जाणून घेऊया

1. भेंडीचे पोषक आणि गुणधर्म

nutritionvalue.org ( ref ) नुसार 100 ग्रॅम भेंडीमध्ये 35 कॅलरीज, 1.3 ग्रॅम प्रथिने आणि 0.2 ग्रॅम चरबी असते. ही भाजी फायबरचा उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट सारखे आवश्यक जीवनसत्त्वे देखील असतात. भेंडी मधुमेहावर कशी नियंत्रण ठेवते हे आधी जाणून घेऊया.

Bhindi For Diabetes
Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

2. फायबर

भेंडी ही अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असण्याव्यतिरिक्त विरघळणारा फायबरचा चांगला स्रोत आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे उत्तम खाद्यपदार्थ आहे. फायबरचे पचन होण्यास बराच वेळ लागतो आणि यामुळेच ते रक्तामध्ये साखरेचे प्रमाण हळूहळू सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही.

3. ग्लायसेमिक इंडेक्स

भेंडीतील फायबर गुणधर्म साखरेची पातळी नियंत्रित करतात. या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी असतो. कमी GI म्हणजे ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि ते खाल्ल्याने निघणारी साखर हळूहळू पचते.

Bhindi For Diabetes
High Blood Pressure : मीठाच्या अतिरेकामुळे वाढतो उच्च रक्तदाब त्रास; जडू शकतात अनेक गंभीर समस्या, ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध !

4. प्रथिने

भेंडी ही काही भाज्यांपैकी एक आहे ज्यात प्रथिने देखील भरपूर आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय भेंडीमध्ये कॅलरीजही कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com