Long Hair Tips Saam TV
लाईफस्टाईल

Long Hair Tips : मेहंदी लावताना मिक्स करा 'या' गोष्टी; केस होतील सॉफ्ट आणि सिल्की

Hair Care Tips : केसांच्या सुंदरतेसाठी त्यावर हिना मेहंदी लावत असाल तर मेहंदीमध्ये या गोष्टी सुद्धा मिक्स केल्या पाहिजेत.

Ruchika Jadhav

प्रत्येक महिलेला सॉफ्ट आणि सिल्की केस फार आवडतात. केसांची सुंदरता कमी होऊ नये म्हणून महिला सतत त्यांवर विविध प्रोडक्ट अप्लाय करत असतात. केस शाइन करावेत म्हणून काही महिला केसांवर मेहंदी सुद्धा अप्लाय करतात. मेहंदी अप्लाय करताना त्यात काही विशिष्ट गोष्टी मिक्स केल्याने केसांना आणखी सुंदर रंग येतो आणि केस घट्ट होतात.

आम्ही सांगितलेल्या काही नैसर्गिक वस्तू तुम्ही मेहंदीमध्ये मिक्स केल्यास त्याने केसांना वाढीसाठी देखील बरीच मदत होते. केस पांढरे झाले असतील तर ते काळे होण्यास सुद्धा मदत होईल.

मेहंदीमध्ये चहा पावडर मिक्स करण्याचे फायदे

चहा पावडरमध्ये असलेलं टॅनिन केसांची मुळे घट्ट करतं. तसेच केसांची चमक सुद्धा जास्त वाढवतं. ज्या व्यक्तींचे केस लाल किंवा सफेद झाले असतील त्यांच्यासाठी ही मेहंदी फार उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स सुद्धा असतात त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते.

मेहंदीमध्ये आवळा मिक्स करण्याचे फायदे

आवळा फळामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. केसांना फाटे फुटू नयेत. तसेच त्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी आवळ्यातील व्हिटॅमीन सी काम करते. मेहंदी भिजवत असताना तुम्ही यात आवळे शुजवून त्याची प्युरी मिक्स करू शकता. किंवा कच्चा आवळा किसून तो देखील मिक्स करून घेऊ शकता. याने केस गळतीची समस्या कमी होते.

मेहंदीमध्ये रिठा मिक्स करण्याचे फायदे

केसांना लावायच्या मेहंदीमध्ये तुम्ही रिठा सुद्धा मिक्स करू शकता. त्यासाठी रिठा रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. पाण्यात भिजल्याने रिठा नरम होतो आणि त्याची साल काढून त्यापासून शाम्पू बनवता येतो. मेहंदी नंतर काही महिला केसांना शाम्पू करतात. मात्र असे करण्याऐवजी मेहंदीच्या मिश्रणात रिठा असेल तर केस याने अपोआप शाम्पू होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT