Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : तूपामध्ये 'या' गोष्टी मिसळल्यास केस गळतीची समस्या होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी अनेक महिला या केसांच्या समस्येमुळे प्रचंड हैराण असतात. आपले केस कायम चांगले राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अनेक महिला तसेच पुरुष मेडिकल ट्रीटमेंटच्या साहाय्याने केसांचे सौदर्यं वाढवण्याचा प्रयत्न करतात. पंरतू तुम्ही केसांचे सौदर्यं वाढवण्यासाठी घरगुती पद्धतीचाही वापर करु शकता. या पद्धतीच्या साहाय्याने केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊयात घरगुती पद्धतीबद्दल.

एलोवेरा जेल आणि तुपाचे फायदे

घरगुती तूप केसांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही तूपात कोरफडीचा गर मिसळून केसांना लावू शकता. कोरफडीच्या गरामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात,जे गळती कमी करण्यास मदत करतात. ऐवढेच नाही तर कोरफडचा गर टाळूनला हायड्रेट ठेवण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.

हे मिश्रण कसे तयार करावे?

जर तुम्हाला तुमचे केस(hair) लांब आणि चांगले दिसावे असे वाटत असल्यास तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण केसांना लावू शकता. जर तुम्ही आठवड्यातून दोनदा मिश्रण लावल्यास तर त्याचा फायदा दिसून येईल. हे मिश्रण तयार करण्यासाठी दोन चमचे तूप आणि एक चमचा कोरफड जेल मिक्स करावे त्यानंतर केसांना हे मिश्रण लावावे. साधारण ३० मिनिटे हे मिश्रण केसांमध्ये ठेवावे त्यानंतर शैम्पूने केस धुवावे.

२- तूप आणि खोबरेल तेलाचा वापर

तुम्ही कोरफड(aelovera) जेल नाही तर तूपासोबत खोबरेल तेलाचाही वापर करु शकतो. याचे मिश्रण केस मजबूत होण्यास शिवाय केस तुटणे कमी करते. शिवाय टाळूचे पोषण आणि केसांचा कोरडेपणा तसेच खाज कमी करण्यास मदत होते.

मिश्रण कसे तयार करावे...?

तूप (ghee)आणि खोबरेल तेलाची पेस्ट करण्यासाठी २ टेबलस्पून तूपामध्ये काही प्रमाणात खोबरेल तेल मिसळा. हे तयार झालेले मिश्रण केसांना आणि टाळूला रात्रभर लावून ठेवा. सकाळी उठल्यानंतर केस थंड पाण्याने धुवून टाका. या मिश्रणाचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

केसांसाठी तयार केलेले हे मिश्रण जेव्हा केसांना लावता त्यावेळी केस कायम थंड पाण्याने धुवावीत. जर तुम्ही केस गरम पाण्याने धुवाल तर टाळूची त्वचा कोरडी होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला नारळाची किंवा कोरफडची अॅलर्जी(allergy) असल्यास याचा वापर करणे टाळावे.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली

Marathi Live News Updates : शहापुरात अतिमुसळधार पाऊस, ७ वाहने नदीच्या प्रवाहात वाहून गेले

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

Kolhapur News: शाळेला जायची घाई, खोकल्याचं औषध समजून किटकनाशक प्यायला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू

SCROLL FOR NEXT