Marathi Live News Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, अनेक वाहने अडकली

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 7th july : राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन अपडेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, अनेक वाहने अडकली

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी, वेताळबाबर्डे, व पणदुर भागात महामार्गावर पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई व गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या अडकल्या आहेत. महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची उद्या बैठक

विधानपरिषद निवडणूक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता महिला आर्थिक विकास महामंडळ च्या सभागृहात होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे दोन उमेदवार देण्यात आले आहेत आणि कोणताही दगा फटका या निवडणुकीत होता कामा नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी करण्यात येत आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi : इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत

जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यामध्ये भवानीनगर येथे आगमन झालं. याप्रसंगी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तालुक्याच्या वतीने स्वागत केलं. पालखीच्या रथामध्ये बसून सारथ्य केलं. यावेळी सर्व वारकरी बांधवांच्या उपस्थितीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तसेच सर्व वारकरी मंडळींना शुभेच्छा दिल्या.

Rain News : रत्नागिरी - चिपळूणच्या कालुस्ते घाटात कोसळली दरड

रत्नागिरी - चिपळूणच्या कालूस्ते घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर आली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूण कोंडे करंबवणे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती आली आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं माती बाजूला कारण्याचं काम सुरु झालं आहे. माती रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर सहा फुटांपर्यंत पाणी,  अनेक वाहने पडली अडकून

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे मुंबई गोवा महामार्गावर पावशी, व वेताळबाबर्डे येथे महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे महामार्गावर नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर काही ठीकाणी सकल भागात पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे या पाण्यात वाहणे अडकून पडली होती.

Ahmednagar News: दूध आणि कांद्याच्या दरासाठी अहमदनगरमध्ये जन आक्रोश आंदोलन; आज तिसरा दिवस

आज तिसऱ्या दिवशी अचानक खासदार निलेश लंके यांनी शहरातून ट्रॅक्टर रॅली काढली. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे 50 ते 60 ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सामील झाले आहेत महिला तरुणांसह शेतकरी या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले असून स्वतः खासदार निलेश लंके हे ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभागी झाले आहेत. ही रॅली अहमदनगर शहरातील प्रमुख मार्गावरून पुन्हा आंदोलन स्थळाकडे जाणार आहे.

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

अमरावती शहरातही मुसळधार पाऊस सुरू झालाय. शहरातील इर्विन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहनचालकांची तारांबळ शहरातील अनेक भागात अर्धा ते एक फूट रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस खोळंबा झालाय.

Sharad Pawar: बारामती तालुक्यातील पिंपरी येथील ओम साई लक्ष्मी लॉन्समध्ये दिली भेट

बारामती तालुक्यातील पिंपरी येथील ओम साई लक्ष्मी लॉन्स मध्ये दिली भेट.

शरद पवार यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, संत तुकाराम महाराजांचे वंशज बापू महाराज मोरे व्यासपीठावर उपस्थित आहेत.

Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा, अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.

Pune News: नगर -कल्याण महामार्गावर कार आणि एसटी बसला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

पुण्यातील नगर -कल्याण महामार्गावर भीषण अपघात झालाय. ओतुरजवळ कार आणि एसटी बसला अपघात झाला. एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर १५ प्रवासी जखमी झालेत.

Sindhudurg News: सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर

सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सावंतवाडीतील सर्वात मोठी नदी असलेल्या तेरेखोल नदीला पूर आला आहे. पुरामुळे बांदा शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. बांदा दोणोली रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी २४ वर्षांचा,  मद्यप्राशन करून चालवत होता कार

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षाचा आहे. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो घरी गोरेगावला गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लॉन्ग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. त्यानंतर तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. तेव्हा अट्रिक मॉलजवळ अपघात झाला.

Nashik News : छगन भुजबळांची महायुतीत घुसमट होतेय, त्यांना पुन्हा'मविआ'त यायचंय - गजानन शेलार

छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये घुसमट होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे (शरद पवार गट) नाशिकचे शहरअध्यक्ष गजानन शेलार यांची टीका.

भुजबळ यांना महाविकास आघाडीमध्ये परत यायचं असेल तरी सुद्धा शरद पवार त्यांना घेणार नाहीत - शेलार

भुजबळ यांच्या परतीचे दोर आता कापले गेले आहेत, शेलार यांची टीका

शेलार यांनी आज बारामती मध्ये शरद पवार यांची भेट घेतली

नाशिक मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधून १०० पदाधिकाऱ्यांनी केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

Nanded News : नांदेडमध्ये मातंग समाज आक्रमक, नांदेड-देगलूर महामार्ग रोखला

अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणी साठी मातंग समाज आक्रमक झाला आहे .या मागणी साठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर 1 जुलै पासून मातंग समाजाचे नेते प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला पाठिंबा देत लोहा तालुक्यातील कापशी परिसरातील मातंग समाज रस्त्यावर उतरला आहे. नांदेड ते देलगुर महामार्गावर कापशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तास हा महामार्ग या आंदोलनकानी रोखून धरला होता

Pandharpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात धनगर समाज घालणार घेराव

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात धनगर समाज घालणार घेराव

- शेळ्या मेंढ्या आणि घोडे घेऊन धनगर बांधव मुख्यमंत्र्यांना घालणार घेराव

- सोलापूरसह राज्यातील विविध भागातून मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेने रवाना

- एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक

- आषाढी एकादशीच्या पूजेला येण्यापूर्वी आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर मात्र मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार

- धनगर समाजाला एसटीतून आरक्षण, अहिल्यादेवी होळकर महामंडळामार्फत 20 लाखाचे कर्ज वाटप करावे अशी मागणी.

Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा आणखी एका गोळीबाराच्या घटनेने हादरला, १ जण जखमी 

चंद्रपूर जिल्हा आणखी एका गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. बल्लारपूर शहरातील कापड दुकानात गोळीबार झाला. ट्रोल बॉंब फोडून दहशत निर्माण करण्यात आली. दुकानातील कामगार जखमी झाला.

Beed Accident: पोलीस अधिकाऱ्यांच्या दुचाकीला कारची धडक, पीएसआयचा जागीच मृत्यू 

पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुचाकीला कारने चूकीच्या बाजूने जात जोराची धडक दिलीय. या अपघातात एक जण ठार तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या नेकनुर जवळ घडलीय. श्रीधर नन्नवरे असं अपघातात ठार झालेल्या पीएसआयचे नाव आहे. तर या सर्व अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Panvel Rain: पनवेलमध्ये मुसळधार, पावसामुळे रस्त्यांवर साचले गुडघाभर पाणी

कळंबोलीमध्ये मुसळधार पावसामुळे अद्यापही पाणी साचलेले आहे. कळंबोली शहरात गुडघाभर पाणी साचलंय. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पाण्यातून वाट काढतांना नागरिकांची दमछाक होतेय.

Chhatrapati Sambhajinagar News: उध्दव ठाकरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात खोचक बॅनरबाजी

उध्दव ठाकरे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी करण्यात आलीय. अज्ञात व्यक्तीने उध्दव ठाकरे यांच्या विरोधात खोचक बॅनरबाजी केलीय. लोकसभा निवडणुकीसाठी दिलेला शब्द पाळणार का उध्दवजी, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय.

Baramati News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीचा मुक्कामात आटोपून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारीत सहभागी झालेत. बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार वारी चालत आहेत. याचवेळी अजित पवार यांनी तुकोबारायांच्या रथाचे सारथ्य केलंय.

Bhandara Accidet:  दुचाकी घसरल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,  भंडारा जिल्ह्यातील घटना 

पोलीस ठाण्यातून शासकिय काम आटपून घरी जात असताना दुचाकी स्लिप होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना रात्रीच्या सुमारास लाखांदूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील किशोर कपडा बाजार जवळ घडली आहे. सदर मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनिल नामदेवराव राठोड वय 37 वर्ष असे आहे.

Ahmednagar News: जन आक्रोश आंदोलनाचा आज तिसरा दिवस,  शेतकऱ्यांनी गुराढोरांसह ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले

जन आक्रोश आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून कांद्याला आणि दुधाला लिटर मागे 40 रुपये भाव मिळावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या गुराढोरांसह ट्रॅक्टर घेऊन ढोल ताशाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे. आज या आंदोलनाला खासदार सुप्रियाताई सुळे भेट देणार असून थोड्याच वेळात सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी परिसरात सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

Raigad News: रिव्हर राफ्टिंग करून बाहेर पडत असताना पर्यटकाचा मृत्यु, रोहा तालुक्यातील घटना

रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन बाहेर पडत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे घडली आहे. अभिजीत कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह कोलाड येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी कुंडलिका नदी पात्रात रिव्हर राफ्टींग केली आणि नदी पात्रातुन बाहेर पडत असताना ते खाली कोसळले होते.

Kalyan Breaking: उल्हास नदीच्या पाण्यात मृतदेह वाहुन आला, पोलीस तपास सुरू

कल्याण जवळील मोहने येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्हास नदीच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह वाहुन आलाय. स्थानिकांनी याबाबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन विभागाने मृतदेह बाहेर काढला.

Worli Hit And Run: वरळी हिट अॅड रन प्रकरण, पोलिसांनी घेतलं शिंदे गटाच्या नेत्याला ताब्यात  

वरळी हिट अॅड रन प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. मात्र, वरळी हिट अॅड रन प्रकरणात त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता.

Panvel Breaking: पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर, गावांना सतर्कतेचा इशारा

पनवेलमधून मोठी बातमी समोर आली आहे. पनवेलमधील काळुंद्री नदीला पूर आलाय. जोरदार पावसामुळे काळुंद्री नदीला पूर आलाय. नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

 Manoj Jarange Patil : मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांना मोठं आवाहन केलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. २८८ उमेदवार उभे केले, तर त्या मध्ये सर्व जाती धर्माचे उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा मोठा धक्का, राजू शिंदे ठाकरेंच्या सेनेत जाणार

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी राजू शिंदे यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. पक्षप्रवेश आगोदरच राजू शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने राजू शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासाठी बॅनर लावण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या प्रवेशामुळे राजू शिंदे यांच्या रूपाने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

 Nashik News :  नाशिकमध्ये कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था

नाशिकमध्ये कोट्यावधींच्या रस्त्याची अवघ्या महिनाभरात दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता महिनाभरात उखडला गेला आहे. वावी ते शहा रस्त्यावर महिनाभरात जागोजागी खड्डे पाहायला मिळत आहे. हाताने देखील रस्त्यावरील डांबराचा थर निघत आहे.

 Amaravati News : अमरावती कारगृहात फटाके फेकल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा

अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बारुद भरलेले फटाके फेकल्या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी अमरावती कारागृहातून सुटलेल्या कैद्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावलं. शनिवराी तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांनी जल्लोष म्हणून फटाके फेकल्याचा संशय आहे.

Nagpur News : नागपुरातील पाटणसावगीत धुमाकूळ घालणाऱ्या वानराला केलं रेस्क्यू

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत पाटणसावगी परिसरामध्ये काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वानराला रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. गावकऱ्यांच्या मदतीने वन विभागाने वानराला रेस्क्यू केलं. या वानराने दहा ते बारा लोकांना जखमी केले होते. वानर सुद्धा जखमी झाले आहे. त्याच्यावर आता उपचार केले जाणार आहे.

Shahapur Rain Update : शहापुरात अतिमुसळधार पाऊस, ७ वाहने नदीच्या प्रवाहात वाहून गेले

शहापुरात रात्री पासूनच अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भारंगी नदी शेजारी असलेल्या घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने 7 चारचाकी वाहने नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर शहापूर नगरपंचायतीच्या बेजबाबदार पणामुळे हा प्रसंग ओढवला आहे, असं म्हणत नागरिकांनी शहापूर शहरातील आसनगावकडे जाणारा रस्ता अडवला आहे.

Badlapur Rain Update : अंबरनाथ-बदलापुरात पावसाची हजेरी, ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात रात्रीपासून चांगलाच पाऊस पडत आहे. सकाळी देखील या पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.