liver detox drinks  saam tv
लाईफस्टाईल

Liver Detox Juice: लिव्हरला चिकटलेली घाण झटक्यात साफ होणार; घरात तयार करा '3' DETOX Drinks

Health Tips: लिव्हरवरील साचलेली घाण आणि फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी, कॉफी आणि बीटरूट ज्यूस सारखी पेयं अत्यंत उपयोगी ठरतात. डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या आणि तब्येत सुधारवा.

Sakshi Sunil Jadhav

लिव्हरमधील साचलेली घाण आणि फॅट कमी करण्यासाठी तीन डिटॉक्स पेयं उपयुक्त.

ग्रीन टीमधील कॅटेचिन्स लिव्हर एन्झाइम सुधारतात.

कॉफी फॅटी लिव्हरचा धोका कमी करते.

सध्याच्या धावपळीच्या जगात सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जास्त प्रमाणात बदलतात. अनेकांना वेळेवर जेवण घेणेही कठीण होऊन जाते. त्यात बाहेरच्या खाण्याचा जास्त समावेश होतो. याने थेट तुमच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि तो निकामीही होऊ शकतो. हा त्रास वाढू नये म्हणून तसेच वाढलेला त्रास कमी व्हावा म्हणून तुम्ही पुढील पेयांचे सेवन करू शकता.

तुम्ही पुढील पेयाचे सेवन रोजच्या जीवनात केल्याने लिव्हरमध्ये सुधार, फॅट कमी होणे, पचन सुधारणे यासाठी उपयोगी ठरतो. डॉ. सेठी यांनी हे सल्ले त्यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये दिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, मी फॅटी लिव्हर असलेल्या माझ्या रुग्णांना नेहमी तीन पेयं रोज १ ग्लास प्यायला सांगतो. मी लिव्हर तज्ज्ञ आहे त्यांनी सांगितलेल्या पेयांमध्ये ग्रीन टी, कॉफी आणि बीटरूट ज्यूस यांचा समावेश आहे.

१. ग्रीन टी (Green Tea)

डॉ. सेठी यांच्या मते, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स आणि विशेषतः Epigallocatechin-3-gallate हे अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक लिव्हरचे एन्झाइम सुधारतात आणि लिव्हरमध्ये साचलेलं फॅटचे प्रमाण कमी करतात. तसेच ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स कमी करतात आणि लिव्हर पेशींचं रक्षण करतात.

२. कॉफी (Coffee)

कॉफीही फॅटी लिव्हर असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. नियमित कॉफीचे सेवन लिव्हरवरील चरबी आणि फायब्रोसिसचा धोका कमी करतं. मात्र, त्यांनी सल्ला दिला की ऑर्गॅनिक कॉफी निवडा आणि साखर टाळा. आवश्यक असल्यास थोडं मध, स्टेव्हिया किंवा मंक फ्रूट स्वीटनर वापरू शकता.

३. बीटरूट ज्यूस (Beetroot Juice)

बीटरूट ज्यूसमध्ये बेटालाईन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हर पेशींचं संरक्षण करतात आणि चरबी साचणं कमी करतात. मात्र या रसामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असल्याने डॉक्टरांनी मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

टीप: औषधोपचारांइतकाच आहार आणि जीवनशैलीतला बदल सुद्धा या आजारावर मात करण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

Latur Shocking : पुण्यानंतर लातूरमध्ये रक्तरंजित थरार; शेतात गाढ झोपलेल्या बाप-लेकाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकले

SCROLL FOR NEXT