

मासिक पाळी दरम्यान महिलांची केस गळतीची समस्या जास्त वाढते.
आयरनची कमतरता आणि ताण हे मुख्य कारणे आहेत.
गरम तेलाने मसाज आणि केमिकल वापरणं टाळा.
महिलांना दैनंदिन आयुष्यात केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र मासिक पाळीच्या वेळेस या समस्या वाढतात. कारण शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात. तसेच अनेक वेदनांनाही सामोरे जावे लागते. यात केसांचा मुद्दा अगदी ठळकपणे जाणवायला लागतो. पुढे आपण याचे कारण आणि यावरचे उपाय जाणून घेणार आहोत. जे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.
मासिक पाळीत महिलांना पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, मूड स्विंग, स्तनात वेदना जाणवतात. त्यात ही केसांची समस्या आणखी ताण वाढवत असते. अनेक महिलांचा मासिक पाळीच्या काळात केस गळतीचा त्रास अचानक वाढतो. तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळात शरीरातील एस्ट्रोजनचं प्रमाण कमी आणि प्रोजेस्टेरोनचं प्रमाण जास्त होतं. याच हार्मोनल असंतुलनामुळे केस गळायला सुरुवात होते. मात्र ही स्थिती तात्पुरती असते. जशी पाळी संपते आणि हार्मोन पुन्हा संतुलित होतात, तसतसे केस गळण्याचे प्रमाण आपोआप कमी होते.
काही महिलांमध्ये या काळात हेअर फॉलचं प्रमाण जास्त असतं तर काहींमध्ये फारसं जाणवत नाही. हे पूर्णपणे शरीराच्या हार्मोनल प्रतिक्रिया आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतं. ज्या महिलांना पाळी दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्राव होतो, त्यांच्यात शरीरातील लोहतत्वाचं प्रमाण कमी होतं. परिणामी, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळत नाही, ज्यामुळे केस कमकुवत होऊन गळायला लागतात.
जर मासिक पाळीच्या काळात केस गळतीचा त्रास जास्त होत असेल. तर याकडे दुर्लक्ष करू नका. सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर रक्तातील आयरनचं प्रमाण कमी असेल, तर आयरन सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. या काळात पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, आणि व्हिटॅमिन्सयुक्त अन्न घेणं केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर, केसांची योग्य काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. केसांवर जास्त केमिकल्स वापरणं टाळा आणि या काळात गरम तेलाने सौम्य मसाज करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ताण कमी ठेवा. ध्यान, योग आणि पुरेशी झोप घेऊन मानसिक आरोग्य सांभाळल्यास केस गळतीवर नियंत्रण मिळवता येतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.