Sakshi Sunil Jadhav
बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत पोस्टल बॅलेटचे मत मोबाईलने फेसबुकवर अपलोड केल्यामुळे किशनगंज पोलोस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोस्टल बॅलेट पेपर म्हणजे टपालाद्वारे मतदान करण्याची एक विशेष पद्धत आहे. ही सुविधा अशा मतदारांना दिली जाते जे निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत.
मतदाराला त्याचा मतदानाचा हक्क टपालाने वापरण्याची संधी दिली जाते. त्या मतपत्रिकेवर आपला मतदानाचा निर्णय देऊन ती पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांना परत पाठवावी लागते.
सशस्त्र सेना, पोलिस दल, किंवा शासकीय सेवेत परदेशात असलेले अधिकारी ही मतदानाची पद्धत वापरतात.
जे लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत असे व्यक्ती पोस्टल बॅलेटने मतदान करु शकतात. तसेच ८० वर्षावरील अपंग व्यक्तीही मतदान करु शकतात. मात्र जेलमध्ये शिक्षा भोगणारे अपराधी यास पात्र नसतात.
जेव्हा मतांची मोजणी करायला सुरुवात करतात. तेव्हा सगळ्यात आधी पोस्टल बॅलेटने केलेल्या मतांची मोजणी केली जाते. नंतर मग ईवीएमने केलेल्या मतांची मोजणी होते.
जे रुग्ण कोरोनाच्या काळात कोरोनाने ग्रस्त होते त्यांनी पोस्टल बॅलेटने मतदान केले होते. तेव्हा त्यांना याची मुभा देण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.