Liver Cancer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Liver Care Tips: कमी भूक, थकवा, पोटात दुखणे, वजन घटणे ही लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. जाणून घ्या लिव्हर कॅन्सरची सविस्तर माहिती.

Sakshi Sunil Jadhav

लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखणं कठीण असतं, पण दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होतात.

कमी भूक, थकवा, आणि कावीळ ही प्रमुख सुरुवातीची लक्षणं आहेत.

वेळेवर निदान आणि उपचार केल्यास आजार नियंत्रित ठेवता येतो.

लिव्हर कॅन्सर हा सध्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. या आजाराची लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात ठळक दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा हा आजार ओळखायला उशीर होतो. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा या कॅन्सरची लक्षणं दिसतात तेव्हा ती व्यक्तिनुसार वेगवेगळी असतात. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

जेव्हा लिव्हरमध्ये कॅन्सरच्या पेशी तयार होतात तेव्हा या आजाराची सुरुवात होते. यामध्ये हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, बाइल डक्ट कॅन्सर तसेच फायब्रोलॅमिलर कार्सिनोमा सारख्या आजारांच्या प्रकाराचा समावेश होतो. सुरुवातीला लिव्हर कॅन्सरची लक्षणं ओळखणं कठीण असतं आणि जसजसा आजार वाढतो तसतसं उपचार करणं जास्त गुंतागुंतीचं होतं.

तज्ज्ञ सांगतात की, शरीराचं वजन अचानक कमी होणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. जर तुम्ही काहीही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होण्याची समस्या अनुभवत असाल तर हे लक्षण लिव्हर कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. सतेच भूक कमी होणे, सतत येणारा थकवा आणि पोटात वेदना होणे ही लक्षणेही दिसतात. भूक न लागणं हे लिव्हरमधील वाढत्या ट्युमरमुळे होतं. त्यामुळे पोटात गडबड निर्माण होते आणि खाण्याची इच्छा कमी होते.

लिव्हर कॅन्सरमध्ये मळमळ आणि उलट्या ही सुद्धा सामान्य लक्षणे आहेत. लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि सतत मळमळल्यासारखं वाटू लागतं. या आजारांमध्ये तुम्हाला जास्त दमल्यासारखे वाटते आणि कमजोरपणा वाढतो.

कावीळ होणे हे सुद्धा लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे. त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर पिवळसरपणा दिसत असेल तर हे लक्षण रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण वाढल्यामुळे होतं. कारण लिव्हर त्याचं योग्य प्रकारे प्रक्रिया करणं थांबवतो. पोट फुगल्यासारखं (Swelling) जाणवतं. त्वचेवर सतत खाज येते, ताप येतो, रक्तवाहिन्या स्पष्ट दिसतात आणि सहज जखमा होऊन रक्त येतं हीसुद्धा सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

SCROLL FOR NEXT