Live In Or Marriage
Live In Or Marriage  Saam Tv
लाईफस्टाईल

Live In Or Marriage : लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लग्न लोकांचा कोणत्या नात्यावर जास्त विश्वास आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Relationships : जगभरात गेल्या काही दशकापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा ट्रेंड दिसत आहे. यामध्ये दोन प्रौढ व्यक्ती एकमेकांशी लग्न न करता एकत्र राहू शकतात. त्यामुळे लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपची तुलना जगभरात केले जात आहे.

यावर अनेक रिसर्च देखील केले जात आहे तसेच याबाबत ब्रिटिश समाजाचे एक रियालिटी चेक समोर आले आहे.खर तर हा अहवाल ब्रिटिश समाजाचाच आहे परंतु यातून नातेसंबंधी (Relationship) बाबत एक झलक दिसून येते. चला तर मग जाणून घेऊया या अहवालाबाबत.

जोडप्यांचे घटस्फोट घेण्याचे प्रमाण कमी झाल्याचे इंग्लंड आणि वेल्सच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिकस्टिक्स (ONS) च्या अहवालानुसार समोर आले आहे. या आकडेवारीनुसार 2015 मध्ये 101,055 इंग्लंड आणि वेल्स च्या जोडप्यांचा घटस्फोट झाला.9.1 टक्क्यांनी प्रमाण खाली घसरले होते तर 2003 च्या तुलनेत 34 टक्क्यांनी कमी होते.

विवाह आकडेवारी -

गेल्या 45 वर्षाच्या आकडेवारीनुसार लग्न करण्याचे लोकांच्या संख्येत घट झालेली दिसून आले आहे. 247,372 जोडप्यानी 2014 मध्ये इंग्लंड आणि वेल्सी येथे लग्न (Marriage) झाले. हा आकडा 2013 च्या तुलनेत थोडा जास्त होता म्हणजेच 2013 मध्ये सर्वात कमी लग्न झाले आहे. ONS असे म्हणणे आहे की 13 हा शुभ क्रमांक नसल्यामुळे लोकांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले असेल असे असू शकते.

लिव्ह इन रिलेशनशिपचा वाढता कल -

विवाहत घट होण्याचे कारण लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लोक एकटे राहणे पसंद करत आहे.लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लग्न न करता एकत्र राहतात त्यामुळे लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे लोकांना अधिक चांगले वाटत आहे.

शारीरिक संबंधपेक्षा जास्ती लिव्ह इन रिलेशनशिप लाजिरवाणी मानले जाते. लिव्ह इन रिलेशनशिप ची अधिकृतपणे नोंद केलेली नाही. ONS ने जाहीर केलेल्या आकडेवाीनुसार,लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्याची संख्या 2002 मधील 6.8% वरून 9.8 %वर 2016 मध्ये आले.ही आकडेवारी वेल्स आणि इंग्लंड या देशाची आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न?

एका स्टडीच्या अहवालानुसार, जन्माच्या वेळी सोबत असलेल्या जोडप्यांपैकी 9% ते मुलं पाच वर्षाचे होईपर्यंत वेगळे झाले होते आणि सत्तावीस टक्के जोडपे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.

असे समजून येते की विवाहित लोकांपेक्षा लिव्ह इन रिलेशन जोडप्यांमध्ये मुले आहेत. लिंकन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्टीफन मॅक आणि मॅरेज फाउंडेशनचे हॅरी बेन्सन यांनी 40000 कुटुंबांवर केलेल्या सर्वेनुसार एक डेटा समोर आला आहे .

त्यांना असे आढलून आले 2009-10 मध्ये मुलं 14 वर्षाच्या असताना त्याच्या जन्मापूर्वी ज्यांचे लग्न झाले होते त्यांची वेगळे होण्याची शक्यता 24 टक्के जास्त होते, मुलांच्या जन्माच्या वेळी ज्यांचे लग्न झाले नव्हते त्यांची वेगळे होण्याची शक्यता कमी होते याचा आकडा जवळजवळ 69 टक्के होता.

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या ची आकडेवारी स्पष्ट येईपर्यंत किती जोडपे एकत्र राहतात हे सांगण्यासाठी अवघड आहे. परंतु घटस्फोटाचे घटते प्रमाण हे वैवाहिक जीवन स्थिर असण्याचे दर्शवत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT