Life Hack Saam Tv
लाईफस्टाईल

Life Hack : नवीन शूज - सँडल घालून तुमच्याही पायांना होतो त्रास? तर या सोप्या टिप्स करा फॉलो

Shoe Bite : शूजच्या दुकानात जाऊन शूज खरेदी करणे इतके सोपे नाही. त्यांची फिटिंग, डिझाईन, रंग, कम्फर्ट सगळं बघावं लागतं.

Shraddha Thik

Life Hacks For Shoe Bite :

शूजच्या दुकानात जाऊन शूज खरेदी करणे इतके सोपे नाही. त्यांची फिटिंग, डिझाईन, रंग, कम्फर्ट सगळं बघावं लागतं. प्रत्येकाला अशी चप्पल खरेदी करायचे असतात जे घातल्यानंतर पायांना आराम वाटेल. यामुळेच लोक फुटवेअरवर चांगलेच पैसे (Money) खर्च करतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक वेळा नवीन शूज घातल्यानंतर शूज बाईटच्या समस्येला सामोरे जावे लागते. जेव्हा शूजचा त्वचेला (Skin) स्पर्श होतो तेव्हा फोड तयार होतात, ज्यामुळे चालताना किंवा धावताना अस्वस्थता येते. कधीकधी शूज बदलणे हा एक पर्याय आहे, परंतु जर तुम्ही असे न करता या दुखण्यावर औषध शोधत असाल तर काळजी करू नका. शूजपासुन होणारी वेदना टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

खूप घट्ट शूज घालू नका

शूज खरेदी करताना तुमच्या पायाची बोटे दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्या. असे होत असल्यास, तुमचे पाय सुजतात. चपला चावणे आणि फोड टाळण्यासाठी, तुम्ही थोडा मोठा बूट खरेदी करावा.

शूज मऊ करा

शूज चावणे टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमच्या शूजच्या आतील बाजुला मऊ करणे. तुम्ही तुमच्या शूजवर व्हॅसलीन, पेट्रोलियम जेली लावून करू शकता. जिथे पायांना जास्त दुखापत होते अशा ठिकाणी लावा.

ओलावा कमी करणारे मोजे घाला

ओलावा दूर करू शकणारे मोजे घाला . हे मोजे तुमचे पाय कोरडे ठेवण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले असतात आणि फोडांचा धोका कमी करतात.

शूज पॅड घाला

आजकाल शूजच्या आत घालण्यासाठी पॅड्स बाजारात उपलब्ध आहेत. शूज आरामदायक बनवणारे पॅड तुम्ही निवडू शकता. त्यांच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ किंवा फोड येत नाहीत.

सॉफ्ट असलेल्या इनसोलसह शूज निवडा

हार्ड किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या शूजमुळे अनेकदा फोड होतात. जर तुम्हाला प्रत्येक वेळी ही समस्या येत असेल तर, लेदर किंवा कॅनव्हासचे मऊ शूज खरेदी करा. यामुळे त्यांना चावण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे अधिक आरामासाठी असलेले शूजच खरेदी करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT