Manasvi Choudhary
सोळा श्रृगांरापैकी एक म्हणजे कानातले. कानातले हा महिलांचा मराठमोळा दागिना आहे. विविध स्टाईलचे कानातले बाजारात मिळतात.
नावानुसारच हे कानातले चंद्राच्या आकाराचे असतात. यामध्ये कुंदन, मोती आणि रंगाचा वापर केल्यामुळे ते खूप प्रभावी लूक देतात.
सध्या कॉलेज तरुणींपासून ऑफिसमधील महिलांपर्यंत सर्वांच्या आवडीचे सिल्व्हर कानातले ट्रेडिंगमध्ये आहेत.
रेशमी धाग्यांपासून किंवा कापडापासून बनवलेले हे कानातले दिसायला खूपच युनिक आणि वजनाला हलके असतात. यात हाताने नक्षीकाम केलेली असते.
जर तुम्हाला हटके दिसायचे असेल, तर इयर कफ्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे कानातले कानाच्या पूर्ण पाळीला कव्हर करतात.
ज्यांना साधेपणा आवडतो त्यांच्यासाठी मोत्याचे लांब थेंबासारखे कानातले असतात हे कानातले फॉर्मल शर्ट्स, सिल्क साड्या आणि साध्या कुर्तीवर शोभून दिसतात.