Manasvi Choudhary
साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज पॅटर्न हा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. कोणत्याही साडीवर तुम्ही मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करू शकता.
लग्नासंमारभ असो किंवा पार्टी लूक तुम्हाला ग्लॅमरस दिसायचं असल्यास तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊझ लूक करू शकता.
तुम्हाला जर बोल्ड आणि मॉडर्न दिसायचे असेल, तर नूडल स्ट्रॅप हा ब्लाऊज पॅटर्न बेस्ट आहे. या ब्लाऊज स्टाईलमध्ये खांद्याची पट्टी अतिशय नाजूक असते.
'हाय-नेक' ब्लाऊज पॅटर्न तुम्ही ऑफिसलूकसाठी ट्राय करू शकता. कॉटन किंवा लिनन साड्यांवर ही ब्लाऊज स्टाईल भारीच दिसते.
स्लिव्हलेसमध्ये स्वीटहार्ट नेक हा ब्लाऊज प्रकार प्रसिद्ध आहे. या ब्लाऊजच्या कडांना साडीच्या काठाची पायपिंग केल्यास तो पारंपरिक साडीवरही छान दिसतो.
पुढून साधा स्लिव्हलेस ब्लाऊज आणि पाठीमागे मोठी नॉट किंवा 'बो' लावल्यास ब्लाऊजला डिझायनर टच मिळतो.
गळ्याभोवती पट्टा असलेले हे डिझाईन पाठीचा भाग हायलाईट करते. हे अतिशय स्टायलिश आणि हटके दिसते.