हिवाळा म्हटलं की, गुलाबी थंडीसोबत आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात सर्दी-खोकल्याच्या आजारासह त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात. बहुतांश लोकांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय तेलकट असते.
कितीही महागातली क्रिम लावा किंवा योग्य प्रकारे ट्रिटमेंट घ्या. त्वचा तेलकट तर होतेच पण त्याचबरोबर ती चिकटही होताना दिसून येत आहे. या ऋतूमध्ये कोरड्या त्वचेसह तेलकट त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही त्वचेचे सौंदर्य चांगले राखायचे असेल आणि नैसर्गिक चमक आणायची असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या टिप्स फॉलो करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. त्वचा साफ करणे
त्वचा (Skin) तेलकट असल्यामुळे किमान दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर त्वचेसाठी क्लिंजरचा वापर करा. यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल.
2. टोनर
चेहरा धुतल्यानंतर टोनरचा वापर करा. यामुळे त्वचेचे पीएच पातळी राखण्यास मदत करते. तसेच बाजारात (Market) अनेक प्रकारचे टोनर मिळतात. हवे असल्यास तुम्ही गुलाबजलचा देखील वापर करु शकता.
3. सनस्क्रीन
सनस्क्रीनचा वापर फक्त उन्हाळ्यात नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये करायला हवा. सनस्क्रिन तुमच्या त्वचेला प्रदूषणापासून (Pollution) वाचवते. तसेच त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवण्यात मदत करते.
4. मॉइश्चरायझर
मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करते. पण जर त्वचा तेलकट असेल तर जेल मॉइश्चरायझरचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकून राहिल.
5. फेसपॅक
कोरफड, चंदन आणि मुलतानी माती एकत्र करुन त्याचा फेसपॅक त्वचेला लावल्यास फायदा होईल. यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका होईल. त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.