Bitter Gourd Seed Benefits : निस्तेज त्वचेला कडू कारल्याच्या बियांनी पुन्हा चमकदार बनवा, ट्राय करा हा फेसपॅक

Skin glowing Face Pack : आपल्यापैकी बऱ्याच जणांना कडू कारले खाण्यास आवडत नाही. कारल्याच्या कडूपणामुळे आपल्या आहारात समावेश कमी असतो.
Bitter Gourd Seed Benefits
Bitter Gourd Seed BenefitsSaam Tv
Published On

Bitter Gourd Face Pack :

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कडू कारले खाण्यास आवडत नाही. कारल्याच्या कडूपणामुळे आपल्या आहारात समावेश कमी असतो. परंतू कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

साखरेत घोळलं आणि तुपात तळलं तरी कारलं हे त्याचा मुळ गुणधर्म न सोडता आहे तसंच अगदी कडू कडूच राहणार असा एक समजच त्याच्याबद्ल सर्वांचा झाला आहे. कारलं हे कडू असल्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही. कारल्याचे शरीराला खूप फायदे आहेत, पण त्याची चव कडू असते म्हणून सगळे त्याला पाहून नाकं मुरडतात.

Bitter Gourd Seed Benefits
Jasmin Face Pack : चेहऱ्यावरील निस्तेजपणा घालवण्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंधी फेसपॅक बनवा

बहुतांश लोकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही. कारल्याचे दररोज थोड्या प्रमाणात सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि त्वचेसाठी फायदा (Benefits) होतो. कारल्यामध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कारल्याचे जसे फायदे आपल्याला माहिती आहेत तसेच कारल्याच्या बिया ही तितक्याच फायदेशीर आहेत. कारल्याच्या बियापासून बनवलेला फेस पॅक त्वचेवर वापरल्यास तुमच्या त्वचेला अनोखी चमक येऊ शकते.

कायम आपण कारल्याच्या बिया निरुपयोगी म्हणून फेकून देतो. कारल्याच्या बियांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असलेल्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी (Skin) तुम्ही कारल्याच्या बियांचा फेस पॅक वापरून पाहू शकता. कारल्याच्या बियांचा फेस पॅक लावल्यामुळे मुरुम आणि मुरुमांपासून आराम देतो. त्वचेवरील डाग दूर करण्यासही मदत करतो तसेच तेलकट त्वचेची समस्या दूर करते. चला जाणून घेऊया कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा.

साहित्य -

  • 2 चमचे कारल्याच्या दाणे

  • 1 चमचा मध

  • 1 चमचा दही

तयार करण्याची पद्धत -

  • सर्व प्रथम, कारल्याच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून घ्या. त्या बारीक करा किंवा ब्लेंडरमध्ये बारीक करा.

  • आता त्यात मध आणि दही घालून मिक्स करा.

  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.

  • त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

  • आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने त्वचा मुलायम, चमकदार आणि चमकदार दिसेल.

  • हा पॅक 1 आठवड्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com