दरवर्षी भारतात हजारो लोकांना स्वादुपिंडाचा कॅन्सर होतो आणि तो मृत्यूच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या आजाराचा पहिला इशारा शरीराच्या एका अनपेक्षित भागातून म्हणजेच पायांमधून समजू शकतो. या आजारांचा आणि पायाचा नेमका काय संबंध आहे ते जाणून घेऊया.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे डीप वेन थ्रॉम्बोसिस (Deep Vein Thrombosis) होण्याचा धोका वाढतो. यामध्ये पायांच्या नसांमध्ये रक्ताचे गुठळ्या तयार होतात. त्यामुळे पाय दुखणं, सूज येणं आणि त्वचेवर लालसरपणा दिसणं अशी लक्षणं दिसू शकतात. काही वेळा प्रभावित भागाची त्वचा नेहमीपेक्षा जास्त गरम वाटते.
जर ही रक्ताची गुठळी तुटून फुफ्फुसांपर्यंत पोहोचली, तर त्याला पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतात. ही अवस्था अत्यंत धोकादायक ठरते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना आणि श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे ही परिस्थिती फार धोकादायक ठरू शकते
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरचे उपचार, विशेषतः किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेनंतर हालचाल कमी झाल्यास, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आणखी वाढतो.
कॅन्सरशिवायही काही इतर कारणं रक्ताच्या गुठळ्या होण्यास जबाबदार ठरतात. त्यामध्ये अनुवांशिक समस्या, हार्मोन थेरपी, गर्भनिरोधक गोळ्या, व्हेरिकोस व्हेन्स, लठ्ठपणा, धूम्रपान आणि वय वाढणं यांचा समावेश होतो.
स्वादुपिंडाचा कॅन्सर तेव्हा होतो ज्यावेळी यामधील पेशी नियंत्रणाबाहेर वाढून गाठ तयार करतात. सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखणं कठीण असतं. याचं कारण म्हणजे तो अनेकदा स्कॅनमध्ये दिसत नाही आणि अनेक औषधांना रेझिस्टंट असतो.
कावीळ, लघवीचा रंग बदलणं, फिकट रंगाचे शौच, पोट किंवा पाठदुखी, थकवा, त्वचेची खाज, मळमळ, पोट फुगणं, भूक कमी लागणं, वजन घटणं आणि डायबिटीजचा त्रास.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.