Alcohol Damages Liver: दारुमुळे लिव्हरवर किती गंभीर परिणाम होतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Liver Disease Symtoms: मेयो क्लिनिकच्या संशोधनात दारू लिव्हरचं नुकसान कसं करते हे उघड झालं आहे. फॅटी लिव्हर डिसीज, एन्झाइमची भूमिका आणि लिव्हरवर होणारे परिणाम समजावून सांगण्यात आले आहेत.
How Alcohol Damages the Liver
liver disease symtomsgoogle
Published On
Summary

दारूचे अति सेवन लिव्हरचे नुकसान करते.

मेयो क्लिनिक संशोधनात लिव्हरवर परिणाम उघड.

एन्झाइम असंतुलनामुळे फॅटी लिव्हर वाढतो.

दारू मर्यादित ठेवल्यास लिव्हरचे आरोग्य जपले जाते.

सध्याच्या तरुण पिढीसाठी व्यसन ही अतिसामान्य वाटणारी गोष्ट आहे. त्यामध्ये अनेक आम्लीपदार्थांचा समावेश होतो. दारूचे अति सेवन लिव्हरवर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत एक नवे संशोधन समोर आले आहे. अमेरिकेतील मेयो क्लिनिक येथील शास्त्रज्ञांनी लिव्हरवर दारूचा परिणाम कसा होतो, याचा अचूक मेकॅनिझम उघड केला आहे. या संशोधनात Metabolic Dysfunction Associated Steatotic Liver Disease नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजाराचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.

जेव्हा फॅटी लिव्हर डिसीज असतो तेव्हा ही समस्या जास्त वाढते. सध्या अमेरिकेत प्रत्येक तीनपैकी एका व्यक्तीमध्ये आढळते आणि वेळेत काळजी न घेतल्यास ती टाईप २ डायबिटीज किंवा लिव्हर कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते. या संशोधनाचा अहवाल Journal of Cell Biology या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

How Alcohol Damages the Liver
Pigmentation Skin Care: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी 7 घरगुती उपाय, वाचा नॅचरल टिप्स

शास्त्रज्ञांनी सांगितले की, लिव्हर शरीरातील एक महत्त्वाची फिल्टरेशन प्रणाली म्हणून कार्य करते. हिपॅटोसायट्स नावाच्या पेशी शरीरातील विविध रसायनांचे विघटन, प्रोटीन तयार करणे आणि आवश्यक घटक पुनर्वापर करण्याचे काम करतात. या पेशींमध्ये फॅटचे सूक्ष्म थेंब म्हणजेच लिपीड ड्रॉपलेट्स तयार होतात, जे अन्नटंचाईच्या वेळी ऊर्जा पुरवतात. परंतु जेव्हा ही फॅट्स जास्त प्रमाणात साचते, तेव्हा त्यातून फॅटी लिव्हर डिसीज उद्भवते.

एन्झाइम हे शरीरातील खराब प्रोटीन काढून टाकणे आणि पुनर्वापर करणे यासाठी जबाबदार असते. सामान्य स्थितीत हे एन्झाइम नावाच्या प्रोटीनवर नियंत्रण ठेवते, जे लिपिड ड्रॉपलेटच्या भागावर असते. मात्र जेव्हा या प्रोटीनचे प्रमाण वाढते, तेव्हा लिव्हरच्या पेशींमध्ये फॅट साचतो आणि फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागतात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या शोधामुळे भविष्यात फॅटी लिव्हर डिसीज टाळण्यासाठी प्रभावी औषधोपचार आणि प्रतिबंधक उपाय तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे दारूचे सेवन मर्यादित ठेवणे आणि लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

How Alcohol Damages the Liver
Heart Attack Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला; वेळीच जाणून घ्या हे Facts, अन्यथा...
Q

दारू लिव्हरचं नुकसान कशी करते?

A

दारूचे सेवन लिव्हरमधील पेशींच्या कार्यावर परिणाम करते.

Q

या संशोधनात काय नवीन समोर आलं आहे?

A

मेयो क्लिनिकच्या शास्त्रज्ञांनी दारूमुळे होणाऱ्या लिव्हर पेशींच्या नुकसानाचा अचूक मेकॅनिझम शोधला आहे.

Q

फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काय?

A

जेव्हा लिव्हरमध्ये फॅट साचतो आणि पेशी नीट कार्य करू शकत नाहीत, तेव्हा ही स्थिती निर्माण होते.

Q

लिव्हरचं आरोग्य कसं जपावं?

A

दारूचे सेवन मर्यादित ठेवा, संतुलित आहार घ्या आणि नियमित आरोग्य तपासणी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com