Varicose Veins saam tv
लाईफस्टाईल

Varicose Veins: पायातील वेदना असू शकतात व्हेरिकोज व्हेन्सचं लक्षण असू शकतं; डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे उपाय

Varicose veins symptoms: पाय दुखणं, सूज येणं आणि शिरा स्पष्ट दिसणं ही व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणं असू शकतात. दीर्घकाळ उभं राहणं, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली यामुळे हा आजार वाढतो. वेळेत उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

Surabhi Jayashree Jagdish

अनेक लोकांना सतत पाय दुखणं, सूज येणं, पाय जड वाटणं आणि त्वचेखाली वाकड्या-तिकड्या शिरा दिसणं अशा समस्या जाणवतात. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण ती व्हेरिकोज व्हेन्स या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आजाराची चिन्हं असू शकतात. या समस्येवर वेळेत उपचार केल्यास रुग्णाचं आयुष्य सुधारण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चेंबूरमधील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे व्हेरिकोज व्हेन्स तज्ज्ञ डॉ. शिवराज इंगोले यांनी सांगितलं की, सध्या अनेक जण धकाधकीचं जीवन जगतायत. कामाच्या स्वरूपामुळे अनेकांना दीर्घकाळ उभं राहावं किंवा बसून काम करावं लागतं. त्यामुळे पाय दुखणं किंवा पाय जड वाटणं ही समस्या अनेकदा साधा थकवा समजून दुर्लक्षित केली जाते. पण सतत होणारा पायातील त्रास हा व्हेरिकोज व्हेन्सचं लक्षण असू शकतो.

भारतामध्ये लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, विशेषतः ज्यांना बराच वेळ उभे राहून किंवा बसून काम करावे लागते. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायांवरील आणि तळपायांवरील शिरा फुगणं, वाकड्या-तिकड्या होणं आणि त्यांचा आकार वाढणं. शिरांमधील झडपा कमकुवत झाल्याने किंवा खराब झाल्याने रक्त व्यवस्थितपणे हृदयाकडे परत जाऊ शकत नाही आणि ते शिरांमध्ये साचतं. त्यामुळे शिरांमध्ये दाब वाढून त्या त्वचेखाली स्पष्टपणे दिसू लागतात.

वाढतं वय, लठ्ठपणा, गर्भधारणा, कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, दीर्घकाळ उभे राहणं आणि हार्मोन्समधील बदल ही या आजाराची सामान्य कारणं आहेत. शिक्षक, आरोग्यसेवा कर्मचारी, किरकोळ विक्री क्षेत्रातील कर्मचारी, कारखान्यातील कामगार आणि हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कर्मचारी यांना या आजाराचा धोका अधिक असतो.

व्हेरिकोज व्हेन्स आणि पायदुखी

अनेक रुग्ण दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर पाय दुखणं, ठणकणं, जळजळ होणं किंवा पाय जड वाटणं अशा तक्रारी करतात. त्याचप्रमाणे घोट्यांभोवती सूज येणं, स्नायूंमध्ये गोळे येणं, खाज सुटणं आणि निळसर किंवा जांभळ्या रंगाच्या शिरा स्पष्ट दिसणं अशी लक्षणंही आढळू शकतात. दिवसाच्या शेवटी ही लक्षणं अधिक तीव्र होतात.

या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेचा रंग बदलणं, रक्तस्राव होणं, सतत सूज राहणं, वेदनादायक जखमा, रक्ताच्या गाठी किंवा शिरांचं कार्य बिघडणं यांसारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. तीव्र वेदना आणि थकव्यामुळे काही रुग्णांना चालणं किंवा दैनंदिन कामं करणंही कठीण होऊ शकते.

व्हेरिकोज व्हेन्स असलेल्या व्यक्तींनी नियमित चालणं, योग्य वजन राखणं, दीर्घकाळ उभं राहणं टाळणं, वेळोवेळी पाय उंचावर ठेवणं आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कंप्रेशन स्टॉकिंग्ज वापरणं फायदेशीर ठरतं. याशिवाय, लेझर थेरपी, रेडिओफ्रिक्वेन्सी अब्लेशन, स्क्लेरोथेरपी आणि इतर कमी कट देऊन केले जाणारे आधुनिक उपचार यांच्या मदतीने या आजारावर प्रभावी उपचार करता येतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण

Best Bus Accident : पुन्हा बेस्ट बसचा अपघात, २ जणांना चिरडले, व्हिडिओ समोर आला

मोठी बातमी! विधान भवन, पुण्यातील महापौर कार्यालय आणि RSS कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी

Beed Boat Accident : बीडमध्ये काळीज हेलावणारी दुर्घटना! ५० ते ६० भाविकांची बोट गोदावरी नदीत उलटली; अनेक जण बुडाल्याची भीती

साबण की फेसवॉश? तोंड धुण्यासाठी बेस्ट काय आहे?

SCROLL FOR NEXT