Lung cancer: त्वचेवर ही ५ लक्षणं दिसली तर समजा फुफ्फुसांच्या कॅन्सरचा असतो धोका

Surabhi Jayashree Jagdish

फुफ्फुसांचा कॅन्सर

फुफ्फुसांचा कॅन्सर म्हणजे फक्त खोकला, छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास एवढ्यापुरताच मर्यादित नसतो. अनेकदा शरीर काही वेगळे संकेत देत असते आणि त्यातील काही संकेत थेट त्वचेवरही दिसून येतात.

Persistent itching

शरीरात दिसणारे संकेत

डॉक्टरांच्या मते, त्वचेत अचानक होणारे काही बदल हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे सुरुवातीचे इशारे असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. हे संकेत नेमके काय आहेत पाहूयात.

Skin lumps

त्वचेवर गाठी दिसणं

फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये पेशी रक्ताद्वारे त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे त्वचेवर रबरासारख्या गाठी तयार होतात. या गाठी छाती, पाठ, मान किंवा डोक्याच्या त्वचेवर दिसू शकतात.

Clubbing fingers

सतत खाज येणं

काही प्रकारचे फुफ्फुसांचे कॅन्सर शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. त्यामुळे त्वचेवर सतत खाज येणं किंवा विचित्र प्रकारचे पुरळ उठू शकतात. पाठीवर किंवा छातीवर लाल आणि गोल पुरळ दिसणं हे त्यापैकी एक लक्षण आहे.

Jaundice symptoms

त्वचा आणि डोळे पिवळे पडणं

फुफ्फुसांचा कॅन्सर यकृतापर्यंत पसरल्यास पित्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे पडण्याची समस्या निर्माण होते. यालाच कावीळ म्हटलं जातं. अशावेळी थकवा, भूक कमी होणे आणि वजन घटणं अशी इतर लक्षणंही दिसू शकतात.

Serious illness signs

बोटे आणि नखांच्या आकारात बदल

फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमध्ये ‘क्लबिंग’ नावाचा बदल दिसतो. यामध्ये बोटांचं टोक गोलसर आणि फुगल्यासारखं दिसू लागतं. नखं खाली वाकलेली वाटतात. रक्तातील ऑक्सिजनची कमतरता दीर्घकाळ राहिल्याने हा बदल होतो. हा बदल हळूहळू होत असल्याने अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

Body warning signs

त्वचेच्या रंगात बदल

काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये हाताच्या तळव्यांवर जाड आणि मऊसर थर तयार होतात. याला ‘ट्राइप पाम्स’ असं म्हटलं जातं. तसंच मान, बगल किंवा त्वचेवर काळपट डाग दिसू शकतात. कॅन्सरच्या पेशींमधून निर्माण होणाऱ्या काही रसायनांमुळे हे बदल होतात.

Unusual skin conditions

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

Health tips
येथे क्लिक करा