Manasvi Choudhary
उद्या २५ जुलै सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे.
आषाढी एकादशीला मोठ्या भक्तीभावाने विठुरायाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण उपवासाचे व्रत करतात.
हिंदू पंचागानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी साजरी केली जाते.
२४ जुलै २०२६ रोजी सकाळी ०९.१२ वाजता असून एकादशी तिथी समाप्ती २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३४ वाजता आहे.
आषाढी एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त हा २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११ पर्यंत आहे. या दिवशी मनोभावे पूजा करून उपवासाचे व्रत करा.
२६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.१३ ते सकाळी ८.५० या वेळेदरम्यान व्रत पारण करण्याचा शुभ मुहूर्त आहे.