Manasvi Choudhary
उद्या आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे बनवले जातात.
मात्र यासाठी लागणारे साबुदाणा खरेदी करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण बाजारात साबुदाण्याची मागणी वाढल्याने भेसळयुक्त बनावट साबुदाण्याची विक्री सुरू आहे.
साबुदाण्यातील भेसळ तुम्ही ओळखणे महत्वाचे आहे नाही तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी घरच्या घरी भेसळयुक्त साबुदाणा ओळखा.
साबुदाणा हा टॅपिओका नावाच्या वनस्पतीच्या मुळापासून तयार केला जातो त्यानंतर तो लहान मोत्यासारख्या कणांमध्ये प्रक्रिया करून वाळवला जातो.
भेसळयुक्त साबुदाणा बनवण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइट, कॅल्शियम हायपोक्लोराइट, ब्लीच, फॉस्फेरिक अॅसिड ही रसायने मिसळली जातात यामुळे पोटाचे विकार होतात. साबुदाणा पचायला जड जातो.
साबुदाणा खरेदी करताना स्वच्छ आणि समान आकाराचे निवडा. तुटलेले, लहान किंवा मोठे साबुदाणा खरेदी करू नका.
साबुदाणा जाळला तो स्टार्चप्रमाणे जळतो आणि त्याचा दुर्गंधीयुक्त वास येत नाही मात्र जर साबुदाण्यामध्ये प्लॅस्टिकची भेसळ असेल, तर तो प्लॅस्टिकसारखा जळतो, त्याचा काळा धूर निघतो आणि वास येतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.