Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

Marathi Breaking Live Headlines Updates : नीट पेपरफुटीवरून सीजेपीचे आज देशव्यापी आंदोलन, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी सजली आहे.

लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत

सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

ड्रोनमधू पंढरपूरचे टिपलेले विहंगम दृष्य

आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

वारी मध्ये आनंद आहे

आंदोलन मध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये

पोलिसाना पण मारहाण झाली आहे.

ठाकरे बंधू एकत्रित येऊन काही तरी करत आहेत ही मोठी गोष्ट आहे

मला महाराष्ट्रातच राहायचे आहे,मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार

गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

मुंबई-नाशिक मार्गावर चारचाकी वाहनाला लागली आग...

ठाण्यातील कोपरी उड्डाण पूलावर काही वेळापूर्वी ठाणे नाशिक मार्गावर एका चारचाकी वाहनाला अचानक लागली आग...

आग लागण्याचे कारण अस्पष्ट...

अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोपरी वाहतूक शाखेचे कडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू...

या घटनास्थळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही..

नागपूर-केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चचे आयोजन..

- नागपुरातील रामनगर चौक ते लक्ष्मी भुवन चौकापर्यंत काढण्यात आला कॅनडल मार्च....

- NSUI महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल चौधरी यांच्या नेतृत्वात कँडल मार्चचे आयोजन..... काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधेसह पदाधिकारी झाले सहभागी...

कल्याणच्या फडके मैदानावर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या समर्थनात उद्या आंदोलन

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कल्याणमधील फडके मैदानावर उद्या २५ तारखेला दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत तरुण आणि विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी सध्या तयारी सुरू झाली आहे.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया

बीड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली या मध्ये लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर दुसरीकडे बीड शहराला 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नाही तर यामुळे आता काही दिवस या बीड शहर वासीयांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे हि जलवाहिनी दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. डहाणू–बोर्डी–झाई–उंबरगावला जोडणारा महत्त्वाचा राज्य मार्ग नरपडजवळ दोन ठिकाणी सुमारे 60 मीटरपर्यंत वाहून गेला आहे. त्यामुळे बोर्डी, घोलवड, चिखलीसह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, उद्यापर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोदावरीला महापूर; नांदूर-माध्यमेश्वर धरणातून 94 हजार क्यूसेक विसर्ग, निफाड-सिन्नर मार्ग बंद

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूर-माध्यमेश्वर धरणातून 94 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या विसर्गामुळे निफाड-सिन्नर मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदीकाठच्या भागात सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्थितीचे ड्रोनद्वारे टिपलेले छायाचित्र छायाचित्रकार पंडित मुदगल यांनी घेतले आहे.

जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

दिल्लीतील जंतर मंतर येथे सिजेपी च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनात मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी अमानूष लाठीचार केला.त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या आंदोलन समर्थन देण्यासाठी आंदोलन केले जात आहे.भिवंडीत आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शांतीनगर परिसरात एक देश,एक भावना" या स्लोगन खाली तिरंगा रॅलीचे आयोजन शुक्रवार दुपारी करण्यात आले होते.या आंदोलनात हजारो युवक युवती हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते.

देऊळगावराजात विद्यार्थ्यांचा शांततापूर्ण मोर्चा; लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे असंख्य विद्यार्थ्यांनी जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्ज घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच परीक्षांमध्ये पारदर्शकता, निकाल तात्काळ जाहीर करणे, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई तसेच स्पर्धा परीक्षांसाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणातील दोषी अधिकारी व पोलिसांवर कारवाई, दाखल गुन्हे मागे घेणे आणि जखमी विद्यार्थ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे .

पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चे आंदोलन

दादरच्या शिवाजीपार्कात नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही शनिवारवाड्यासमोर CJP च्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

वाशिम मध्ये भरलं आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन....

आषाढी एकादशी निमित्त वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थानी वारी परंपरा या वर आधारित काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं...या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेली २०० पेक्षा जास्त चित्र लावण्यात आलीत आली आहेत. कला शिक्षक रा.मु.पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय आणि वारीची परंपरा समजावी तसेच त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं....

Dadar : आदित्य-अमित ठाकरे CJP च्या आंदोलनात 

आदित्य- अमित ठाकरे CJP च्या आंदोलनात सामील झाले आहेत. थोड्यच वेळात सामुहिक राष्ट्रगीताला सुरुवात होणार.

Dadar : दादरच्या शिवाजीपार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन

दादरच्या शिवाजीपार्कात नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सामील झाले आहेत.

देशासाठी गडचिरोलीच्या सुपुत्राचे सर्वोच्च बलिदान; बीएसएफ जवान सुरेश आंबडर शहीद

गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद बातमी... कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील बीएसएफ जवान सुरेश दुर्गा आंबडर भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान शहीद झाले आहेत.

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये भर पावसात महामोर्चा

अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे समाजात फूट पाडण्याचा राज्य सरकारचा कुटिल डाव असून, या प्रस्तावित वर्गीकरणाविरोधात पिंपरी-चिंचवडमधील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निगडी येथे भरपावसात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले.

अमरावतीत मातंग समाज आक्रमक... एससी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी 

अनुसूचित जाती (SC) आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ नुसार उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला, यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाला पोलीस छावनीचे रूप आले होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, दरम्यान मोर्चा पुढ अमरावती जिल्हाधीकारी कार्यालयावर मोर्चा धडकला मात्र त्यापूर्वी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवण्यात आला, दुसरी कडे अनुसूचित जाती मधून मातंग समाजाला वेगळ आरक्षण देऊन उपवर्गीकरण लागू करा अशी मागणी करण्यात आली.

Pune: अजितदादा पवार कृषी समृध्दी कर्ज योजना शुभारंभ

पुणे -

अजितदादा पवार कृषी समृध्दी कर्ज योजना शुभारंभ

आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थिती मध्ये पार पडत आहे

गणेश कला क्रीडा मंचात याच आयोजन करण्यात आल आहे

Pandharpur: पंढरपुरमध्ये आषाढी एकादशी कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

पंढरपूर

आषाढी एकादशी कृषी प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सोलापूरचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थितीत

आषाढी एकादशी कृषी प्रदर्शन कार्यक्रमात प्रशांत परिचारक यांना आमदार की न दिल्याने परिचारक यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्याकडे म्हणजे परिचारक यांना आमदार की देण्याची मागणी.. नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिचारक यांना भाजप ने उमेदवारी न दिल्याने कार्यकर्ते होते आजच्या कार्यक्रमात नाराजी सूर दिसला...

Thane: ठाण्यात मुस्लिम समाजाकडून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंब देत आंदोलन

ठाण्यातील राबोडी येथे मुस्लिम समाजाकडून आंदोलन

जंतर - मंतर येथील विद्यार्थ्यांनाचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

सरकारच्या विरोधात घोषणा बाजी

आंदोलन करताना मेलोडी वाटप

Kalyan: कल्याणमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

कल्याणमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

कल्याण शहरातील सिंडिकेट परिसरातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

या आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले असून,कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Pandharpur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशींसाठी पंढरपूरमध्ये दाखल

पंढरपूर -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशींसाठी पंढरपूरमध्ये दाखल

३.३० वाजता कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आणि शेतकरी मेळावा, कृषि उत्पन्न बाजार समिती आवार

४.३० वाजता ग्रामविकास आणि पंचायतराज विभागातर्फे ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या चरणसेवा उपक्रमाचा समारोप, पंचायत समिती

सायंकाळी ६ वाजता ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी'या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप, शासकीय विश्रामगृह

Palghar: पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

पालघर -

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं होतं.

नदी नाले ओसांडून वाहत होते याचवेळी धामणी धरणाचे पाणी सोडल्याने सूर्या नदीला मोठा पूर आला होता.

उर्से कॉलनीपाडा जवळील सूर्या नदीच्या मध्यभागी असलेल्या दाभाडी बेटावर भात रोपणी करण्यासाठी गेलेले नागरिक 24 तासा पेक्षा जास्त काळ अडकून पडले होते.

या बाबत प्रशासना ला कळविल्यावर आज ndrf आणि स्थानिक पोलिसांनी बचाव कार्य करत नागरिकांना बाहेर काढले.

Delhi: कॉक्रोच जनता पार्टीच्या २ मागण्या सरकारकडून मान्य

कॉक्रोच जनता पार्टीच्या २ मागण्या सरकारकडून मान्य

सरकार पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार

आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार

Pune: पुण्यातील शनिवारवाड्यासमोर कोक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

पुणे -

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर कोक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

आंदोलनाला विध्यार्थ्यांची मोठी गर्दी

पोलिसांचा आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा

लालमहाल ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यत मोर्चाचे आयोजन

नाशिक- पुढील २ दिवस रामकुंड परिसर बंद ठेवण्यात येणार

- गोदावरीची पूर परिस्थिती कायम असल्यानं रामकुंड परिसर बंद ठेवण्यात येणार

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार असल्यानं निर्णय

कल्याणात काँग्रेस भाजपचे एकापाठोपाठ एकमेकांविरोधात आंदोलन

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बरखास्तीची मागणी करत आंदोलन केले, तर त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिआंदोलन छेडले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु, पेपर फुटीच्या कायद्यावर चर्चा सुरु

मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत स्वतः पंतप्रधान उपस्थित असून पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक पारदर्शकता कशी आणायची यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

या मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर करण्यावरही चर्चा होऊ शकते. कायद्यातील तरतुदींवरही सविस्तर विचार केला जाईल. 

अमरावती शहरात आजपासून दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्ती

शहरात वाढलेली वाहतूक, यासोबत शहरातील वाढते अपघात लक्षात घेता हेल्मेट सक्तीचा निर्णय..

शहरातील ठिकठिकाणच्या चौकात वाहतूक पोलिस तैनात..

विना हेल्मेट चालविणाऱ्या वाहनाना दिला जातो आहे दंड..

शहरात दुचाकीवर फिरताना स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहन चालकांनी हेल्मेट वापरावे पोलिस आयुक्त राकेश ओला यांचे आवाहन..

जंतर-मंतरवरून लोक जाणार नाहीत, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देत नाही- अभिजीत दिपके

आमच्या क्लिअर मागण्या आहेत - धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. ज्या परिवारांच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना कॉम्पन्सेशन भेटलं पाहिजे आणि ज्या-ज्या मुलांवर खोट्या केसेस करण्यात आल्या २० जुलैवर, त्यांना सगळ्यांना सोडून देण्यात यावं.

केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेसाठी CJP रवाना

कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जंतर मंतर सोडलंय. हे दोन्ही नेते लवकरच केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहेत.

जालना- दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनात जालन्यात तरुणाई रस्त्यावर

दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचार्जचा जालन्यातील विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त..

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी....

जालना शहरातील मस्तगड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा....

मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी

सोन्याच्या दरात व चांदीच्या दरात पुन्हा घसरण

सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण

आजचा सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 47 हजार 290 तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 29 हजार 690

आखाती देशातील होणाऱ्या युद्ध जमिनीत परिस्थितीचा थेट परिणाम सोने व चांदीच्या दरावर

फलटणजवळ कारचा भीषण अपघात; कारमधील एका हॉस्टेलच्या ३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू तर ३ गंभीर जखमी

वाठारनिंबाळकर हद्दीत स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये जेवण करून हॉस्टेलकडे परतत असताना चालकाचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या कठड्याला जोरदार धडकून पलटी झाली.

लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय

विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

 सरकार चर्चेसाठी तयार आहे- जगदंबिका पाल

पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल म्हणाले, "माननीय संसदीय कामकाज मंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख केला असून, आपण मागणी करत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सरकारच्या कृतींवर चर्चा करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधानांनीही अधिक कठोर कायद्याची मागणी केली असून, मंत्रिमंडळात यावर चर्चा करण्याविषयी भाष्य केलं आहे."

लोकसभेत काय म्हणाले किरेन रिजिजू?

किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितलेल्या सर्व कायद्यांवर आम्ही निर्णय घेणार आहोत. जर आपण यावेळी संसदेत त्यावर चर्चा केली नाही, तर चांगला संदेश जाणार नाही. मी राहुल गांधींना विनंती करतो की त्यांनी हे त्यांच्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांना समजावून सांगावे.

संसदेत पुन्हा गोंधळ... दिल्ली, मुंबई ते पाटणापर्यंत विद्यार्थ्यांची आंदोलनं!

लोकसभेत विरोधकांनी गोंधळ सुरु केला आहे

विरोधकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

नागपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७ टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

- जिल्ह्यातील धरणांमध्ये ५७ टक्के पाणीसाठा, गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

- या आठवड्यात सातत्याने पाऊस होऊनही, नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

- यामुळे खरीप हंगामातील सिंचनाच्या पाणी उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

- या जलाशयांमध्ये एकूण ८३२.५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता, जो एकूण क्षमतेच्या ५७.४२ टक्के आहे.

पवना धरण 95 टक्के भरले

पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांची तहान भागवणारं अन शेतीला उपयुक्त ठरणारं पवना धरण अखेर 95 टक्के भरलंय.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

सद्यस्थितीत ४८०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Pune : रस्त्याच्या खड्ड्यात शौचालयाचे भांडे ठेवून पुणे पॅंथर सेनेचे अभिनव आंदोलन

विश्रांतवाडी येथील प्रभाग क्र. २ मधील शांतीनगर परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या निषेधार्थ पुणे पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी रस्त्यावरील खड्ड्यात प्रतीकात्मकरीत्या शौचालयाचे भांडे ठेवून अभिनव आंदोलन केले. या आंदोलनातून पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध करण्यात आला.

5 दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

गेल्या 5 दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

नदी नाले पुन्हा प्रवाहित रात्री अति मुसळधार पावसाच्या सरी नद्यांना पूर.

गोदावरीला पूर! कोपरगावातील छोटा पूल रहदारीसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय..

गोदावरीला पूर आला असून अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरातील छोट्या पूलाच्या लेवलपर्यंत पाणी पोहोचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे

चांदोली धरण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस सुरू असल्याने वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वारणा धरण 77.39 टक्के भरले असून धरणात एकूण 26.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Lonavala : लोणावळ्यातील टायगर पॉईंट हरवला धुक्यात

पाऊस आणि धुक्याचा आनंद सध्या लोणावळ्यात पर्यटकांना मिळत असल्याने धर्तीवरचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरु लागली आहे.

उंच घाट माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टायगर पॉइंट ला पर्यटक पावसाळ्यात मोठी पसंती देतात, सध्या टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट

मात्र गेले दोन दिवस हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाचा चकवा

अजूनही पाऊस बरसतोय सरींवर, मुसळधार पावसाची प्रतिक्षा

जिल्ह्यात २२ जुलैपासून पाऊस जोरदार पडणार असा हवामान विभागाने वर्तविला होता अंदाज, गेले दोन दिवस होता ऑरेंज अलर्ट

नाशिक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पुराचे पाणी शिरल्याने शाळा-कॉलेजेसना सुट्टी, अनेक रस्ते बंद 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, गोदावरी नदीची पाणीपातळी अजूनही धोका पातळीच्या वरच वाहात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी कापूस पिके करपली....

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पाण्याअभावी उगवलेल कापूस पिके शेतातच जडू लागली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने कापसाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या लपंडावामुळे आणि कोरड्या हवामानामुळे ही तरुण पिके ऐन वाढीच्या काळातच वाया गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणा मुळे हातातोंडाशी आलेला घास हिवाळा लागल्यासारखा हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पिके पूर्णपणे खराब झाल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढवली आहे. पहिल्या पेरणीसाठी आणलेले बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाया गेल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या दुबार पेरणीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अमरावती जिल्ह्यात खरीप पेरणी ९० टक्क्यांवर!सोयाबीन, मका व तुरीचे क्षेत्र घटले,कापसाच्या पेरणीत वाढ

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला असून आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ८२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ११ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली असून कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

आषाढी एकादशीसाठी शेगावात भक्तांची उसळली गर्दी; गजानन महाराज मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले..

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आजपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता आज आणि उद्या मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या मंदिरात अभिषेक, भजन-कीर्तन, महापूजा आणि इतर विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.

विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने १५०६ वारकरी पंढरपुरकडे रवाना..

आषाढी एकादशी चे सोहळ्यासाठी खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून 1506 वारकरी घेऊन रेल्वेची पहिली फेरी पंढरपूरकडे प्रस्थान केलीय.. दरम्यान मोठ्या संख्येने खामगाव रेल्वे स्थानकावर परिसरातील वारकरी मंडळी जमली होती .. विठू माऊलीचा जयघोष करत हे सर्वजण आनंदी वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.. दरवर्षी फक्त आषाढी करता खामगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला परिसरातील वारकरी शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो, दुसरी फेरी सुद्धा लवकरच प्रस्थान करणार आहे. . या रेल्वे फेरी मधून रेल्वे प्रशासनाला पाच लाख पंचेचाळीस हजार 152 रुपयाचे उत्पन्न झाले. तर भाविकान मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ..

जालन्याच्या महापौरांनी दिलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवकाने फाडली

जालन्याच्या महापौरांनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी डस्टबिनमध्ये टाकली आहे.जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी महापौर वंदना मगरे यांनी भाजपच्या दोन, शिंदे सेनेच्या एका आणि एका अपक्ष नगरसेवकाला शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसा रद्द केल्या आहेत. दरम्यान मी सभेत कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरले नाही तरीही मला महापौरांनी नोटीस बजावली महापालिकेत विरोधकांचा आवाज दाबण्याच काम सुरू असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी केला आहे.

nashik-kalvan-सततचा पाऊस,पुर पाण्यामुळे शेतात पाणीच पाणी

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालूक्यातील पश्चिम पट्ट्यात तीन दिवसां पासून सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर धरण क्षेत्रा लगत असलेल्या शेतां मध्ये पावसाचे तसेच नद्यांना आलेल्या पुराचे पाणी साचल्याने मका,सोयाबीन,भात रोपे ही पिक पाण्याखाली गेली असून त्याचा फटका पिकांना बसण्ची भिती व्यक्त केली जात आहे.तर चांगल्या पावसामुळे रखडलेली भाताची लागवण काही भागात होण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

- नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबाचे करण्यात आले स्थलांतर

- चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने प्रशासनाकडून खबरदारी

- 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीत हलवले

- गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर

- जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना जेवण आणि निवासाची करण्यात आली व्यवस्था

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल,भोकरदन पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

जालन्यातील पिंपळगाव सूळ येथे बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केल्याने एका शेतकऱ्याला शिवीगाळ करीत काठीने व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा जाधव असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सूळ शिवारात पूर्णा नदी पात्रात हि घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत विसर्ग सुरू

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचे जोरदार तांडव सुरू आहे.. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने, 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय.. गेल्या 24 तासात घाटघर परिसरात 300 तर रतनवाडी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.. जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत.. पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊस आणि वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत

कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून जाणार मोर्चा

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ म्हणून मोर्चाचे आयोजन

पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे केले आवाहन

nashik-surgana-पावसामुळे नुकसान,एक जण पुरात वाहून गेला

-नाशिकच्या सुरगाणा तालूक्यात गेल्या तीन दिवसां पासून पावसाने चांगलेच धुमशान घातले असून तालुक्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे.तालूक्यातील नद्या,नाल्यांना मोठे पूर आल्याने काही ठिकाणी दरडी कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंज झाले आहे तर छोटे बंधारे फुटून पाणी वाहून शेतात गेल्याने विहिरी गाळ पाण्याने भरल्या व शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.तर भोरमाळ येथिल पुंडलिक मोतीराम चव्हाण ही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट

पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली असली तरी आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते बंद झाले होते तर अनेक गावपाड्यांमधील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. मुसळधार पावसाने रस्ते वाहतूक तसेच रेलवे वाहतुकीवर ही परिणाम झाला होता. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धामणी धरणाचे पाणी सूर्या नदीत सोडण्यात आल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com