Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो! लहान वयात मुलांना आत्मनिर्भर बनवायचंय? 'या' ५ गोष्टी शिकवा, घडेल उज्जवल भविष्य

Essential Life Skills For Kids : आजकालच्या जगात उज्जवल भविष्य घडवण्यासाठी लहान वयातच मुलांना आत्मनिर्भर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना चांगल्या सवयी लावा.

Shreya Maskar

मुलांचे चांगले संगोपन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते की, आपल्या मुलांनी चांगले शिकावे आणि भविष्यात नाव कमवावे. पण यासाठी मुलांसोबत पालकांनी देखील काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे भविष्य उज्जवल घडवण्यासाठी लहान वयातच मुलांना आत्मनिर्भर बनवणे गरजेचे आहे. कारण लहानपण मुलांच्या भविष्याचा पाया आहे आणि तो पाया मजबूत असणे महत्त्वाचे आहे.

पालकांनी मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 'या' गोष्टी शिकवा.

घरची कामे करणे

लहान वयातच मुलांना स्वतःची कामे करायला शिकवा. जेणेकरून ते आत्मनिर्भर बनतील. सर्व गोष्टी मुलांच्या हातात आणून देऊ नका. तसेच पालकांनी मुलांना स्वतः एखाद्या जबाबदारी द्य. तसेच मुलांना असंख्य गोष्टींमधून चांगल्याची निवड कशी करावी हे समजून सांगा. तसेच गरज आणि लक्झरी यातील फरक मुलांना सांगा. पैशांचे मोल मुलांना कळू द्या. जेणेकरून भविष्यात वायफळ खर्च टळेल.

ऑनलाइन कामे

आजकाल ऑनलाइन इंटरनेट शिवाय कोणतेही काम शक्य नाही. त्यामुळे लहान वयात मुलांना ऑनलाइन कामे कशी करायची हे समजून सांगा. त्यांना मोबाइल, कॉम्प्युटरचा योग्य वापर शिकवा. विशेषतः ऑनलाइन बुकिंग शिकवा. भविष्यात करिअरसाठी घरापासून दूर राहायची वेळ आल्यास त्यांना कोणतेही काम कठीण जाणार नाही असे ट्रेनिंग मुलांना द्या.

स्वच्छतेचे महत्त्व

लहान वयातच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्या. त्यांच्या अंगी नीटनेटकेपणाचा गुण बाळगा. तसेच स्वतःला योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा. आपले व्यक्तिमत्व लोकांनावर प्रभाव पाडणारे असावे.

जेवण

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रत्येक मुलाला स्वतःची भूक भागवता येईल असे जेवण तरी बनवता आले पाहिजे. कारण भविष्यात बाहेर जायची वेळ आल्यास तुम्हाला बाहेरच्या जेवणावर अवलंबून रहावे लागणार नाही. तसेच तुमचे आरोग्यही चांगेल राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT