Top 3 Car Launch in July 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Top 3 Car Launch in July 2023 : दमदार मायलेजसह लॉन्च होणार या टॉप 3 कार, 6 लाखांपासून होतेय सुरूवात...

Latest Car Model : बर्‍याच कार उत्पादकांनी त्यांची वाहने लॉन्च करण्याच्या घोषणा केल्या आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Top Car Launches : पुढील महिना जुलै 2023 ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी खूप मोठा ठरेल अशी अपेक्षा आहे. बर्‍याच कार उत्पादकांनी त्यांची वाहने लॉन्च करण्याच्या घोषणा केल्या आहेत, ज्यात मारुतीसारख्या वाहनांचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील महिन्यात लॉन्च होणार्‍या वाहनांपैकी एक निवडू शकता.

यामध्ये 5 सीटर ते 7 सीटर वाहनांचा (Vehicles) समावेश आहे. ज्या वेगवेगळ्या विभागातील असतील. त्याच वेळी, या यादीमध्ये आणखी बरीच नावे जोडली जाऊ शकतात, परंतु सध्या, कार निर्मात्यांननी जुलैमध्ये तीन मोठे लॉन्च निश्चित केले आहेत. त्याचबरोबर कारचे नाव आणि लॉन्च डेट नक्की जाणून घ्या.

Hyundai Xter

Hyundai Xter

Hyundai पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत Xtor ही नवीन मायक्रो एसयूव्ही म्हणून सादर करण्यासाठी सज्ज आहे. ज्यासाठी 10 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही कार कंपनीची सर्वात परवडणारी वाहने असणार आहे, जी SUV पोर्टफोलिओमध्ये Hyundai Venue अंतर्गत ठेवली जाईल आणि बाजारात टाटा पंच आणि Citroën C3 शी थेट स्पर्धा करेल.

Exter फक्त 1.5l पेट्रोल इंजिनसह ऑफर (Offer) केले जाईल, जे 83ps पर्यंत पॉवर आउटपुट करेल. यासोबतच एक सीएनजी किटही असेल. त्याच वेळी, यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल.

Maruti Invicto

Maruti Invicto

कंपनी 5 जुलै रोजी मारुती सुझुकी इनव्हिक्टो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे अधिकृत बुकिंग देखील आजपासून सुरू झाले आहे. 7-सीटर आगामी MPV मध्ये दोन-स्लॅट क्रोम ग्रिल, बंपर-माउंट LED DRLs आणि रुंद एअर डॅम असतील.

या व्यतिरिक्त, MPV ला अलॉय व्हीलचा नवीन संच आणि एक अपडेटेड रीअर प्रोफाइल मिळेल. जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर मारुतीची ही नवीन कार तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. टोयोटासोबत सह-विकसित केलेले हे वाहन, इनोव्हा हायक्रॉसची रिबॅज केलेली आवृत्ती आहे.

Kia Seltos Facelift

Kia Seltos Facelift

भारतीय बाजारात या कारची विक्री ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, यामध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. बाजारात या कारची उपस्थिती लावण्यासाठी कंपनी पुढच्या महिन्यात थोडासा बदल करून पुन्हा सादर करणार आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी आपल्या कारमध्ये ती वैशिष्ट्ये देऊ शकते, जी तिच्या ग्लोबल प्रकारात दिली गेली आहे.

ज्यामध्ये, त्याच्या बाह्य भागामध्ये किरकोळ बदलांसह, त्याच्या केबिनची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि पॅनोरॅमिक सनरूफ, एडीएएस तंत्रज्ञान यांसारखी फीचर्स (Features) देखील त्यात आहेत. त्याच वेळी, नवीन फेसलिफ्टेड सेल्टोसमध्ये 1.5l टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे 160PS पॉवर देण्यास सक्षम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT