Car Care : पावसाळा सुरू झाला की सगळ्यांची लगबग सुरू होते. आपण पावसात प्रवास करताना बहुतेक वेळा सरकारी वाहनांचा वापर करतो. बरेचदा पावसाळ्यात सरकारी वाहनांचा भरोसा नसतो. कधी पावसात अजकण्याची शक्याता असते, परंतू पावसात आपल्या गाडीने प्रवास करने चांगले वाटते.
मान्सून दरम्यान आपले कपडे (Clothes), पाय ओले असतात आणि आपण कधीतरी ते ओलेच घऊन कारमध्ये बसतो, त्यामुळे कारमध्ये पाणी पडल्याने उग्रवास जाणवतो. तसेच भरपूर पावसात गाडीच्या आतही पाणी शिरते, असे अनेकवेळा घडते.
अशा परिस्थितीत गाडीच्या आतील पाणी (Water) कसे काढायचे आणि ते सुकवून पुन्हा कसे स्वच्छ ठेवावे, हे जाणून घेऊया जेणे करून आपल्या कारची काळजी आपण मान्सून आधीच घेऊ शकतो.
मायक्रो फायबर कापड्याचा वापर
जर तुमच्या कारचे केबिन फार ओले नसेल तर तुमचे काम मायक्रो फायबर कापडानेच स्वच्छ (Cleaning) होईल. जर कारचे कारपेट ओले झाले असेल तर ते बाहेर काढून त्यातली माती आणि थोडे जमलेले पाणी सुकवून पुन्हा ते कारपेट आत ठेवू शकतो. जर सीट आणि डॅशबोर्ड ओला असेल तर तुम्ही मायक्रो फायबर कपड्याने कोरडे करून स्वच्छ करावे. तुम्ही वापरत असलेले कापड स्वच्छ असावे हे लक्षात ठेवा.
गाडीच्या आत पाणी असल्यास काय करावे?
पावसाळ्यात वाहनात पाणी तुंबणे सामान्य आहे. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर व्हॅक्यूम क्लिनर हा सर्वोत्तम मार्ग आहे . तुमच्याकडे प्युबास व्हॅक्यूम क्लिनर नसल्यास, तुम्ही ते सहजपणे भाड्याने घेऊ शकता. व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने, तुम्ही पाणी काढून कोरड्या कापडाने पुसून तुमची कार पुन्हा चमकवू शकता. तसेच कार क्लिनर वाल्याकढे नेऊन स्वच्छ करा.
सीटवर साचलेले पाणी काढण्यासाठी काय करावे?
तुमच्या सीटवर साचलेले काढण्यासाठी साधारण टॉवेलचा वापर करा. जेथे पाणी साचले आहे तेथे काही तासांसाठी ते टॉवेल ठेवा, आणि नंतर ते सर्व पाणी टॉवेलने साशून घेतले की काढून टाकावे. जर अजूनही ओले असेल तर त्यांच्या जागी नवीन टॉवेल घाला. अशा प्रकारे पूर्ण सीटवर साचलेले पाणी सुकून जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.