Car Battery Down
Car Battery Down Saam Tv

Car Battery Down : अचानक रस्त्यात कारची बॅटरी डाउन झाली? याप्रकारे करा रिस्टार्ट, कसे ते जाणून घ्या

how to restart Car after battery down: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे कार विकत घेताना आपल्याला बॅटरीचा पर्याय हा फायदेशीर ठरतो.
Published on

Reasons Your Car Battery Is Draining : हल्ली प्रत्येक कंपनी आपल्या कारच्या नव्या अपडेटमध्ये बॅटरीचा समावेश करत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने व पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे कार विकत घेताना आपल्याला बॅटरीचा पर्याय हा फायदेशीर ठरतो. पण अचानक आपली कार भररस्त्यात बंद पडली तर...

अनेकदा तुमच्याकडून चुकून, घाईघाईत, हलगर्जीपणामुळे कार बंद करताना आतल्या लाईट्स चालू राहून जातात आणि जेव्हा गरज असते, महत्त्वाच्या कामासाठी जायचे असते तेव्हा मात्र गाडीची बॅटरी (Battery) उतरलेली असते.अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. तेव्हा आजच्या लेखात आपण कारची (Car) बॅटरी चार्ज (Charge) कशी करावी हे पाहाणार आहोत.

Car Battery Down
Royal Enfield : 'या' 5 कारणांमुळे विकत घेऊ नका बुलेट, लाखो रुपये जातील पाण्यात...

1. कारची बॅटरी डाउन होण्यामागची कारणे

बऱ्याचदा कार बंद करताना आपल्याकडून कारच्या केबीन लाईट्स चालू राहातात. अनेकदा कारला सुरु केल्याशिवाय आपण कारचे म्युझिक सिस्टिम चालू करतो. या कारणांमुळे आपल्या कारच्या बॅटरीवर परिणाम होतो व बॅटरी लवकर उतरते आणि आपल्याला गाडी सुरू करण्यामध्ये देखील अडचणी येतात.

पहायला गेलं तर गाडी बंद होण्याची बरीच कारणे असू शकतात. जर तुमची बॅटरी वारंवार उतरत असेल तर गाडीमध्ये इतरही समस्या असू शकतात. जर तुम्ही कारच्या केबिन लाईट्स बंद ठेवून गाडी सुरू केल्याशिवाय म्युझिक सिस्टीम सुरू करत नसाल तर कदाचित आपल्या गाडीच्या वायरिंगमध्ये बिघाड असू शकतो. त्याचबरोबर आपल्या बॅटरीची मुदत संपली असली तरी देखील असे होऊ शकते. साधारणतः कारच्या बॅटरीचे आयुष्य 3 ते 5 वर्षांपर्यंत असते. त्यामुळे जर तुमची बॅटरी जुनी झाली असेल तर आपल्याला ही समस्या जाणवू शकते.

Car Battery Down
Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

जर या कारणांशिवाय अजूनही कार वेळेत सुरू होत नसेल, अचानक बॅटरी उतरते यांसारख्या समस्यांना सामोरे जात असाल तर तुम्ही जंप स्टार्टचा वापर करू शकता. याकरिता तुम्हाला दुसऱ्या कारची आवश्यता असते. तुम्ही आपल्या कारच्या बॅटरीला जंपर केबलच्या सहाय्याने दुसऱ्या कारच्या बॅटरीसोबत जोडून कार पुन्हा चार्ज करु शकता.

पण असे करताना तुम्हाला दोन्ही बॅटरीच्या धन (Positive) आणि ऋण (Negative) बाजू व्यवस्थित जोडणे आवश्यक आहे. अन्यथा कार सुरू होण्याऐवजी इतर समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्ही जंप स्टार्ट करत असाल तेव्हा कारला काही वेळ सुरु ठेवले पाहिजे. यामुळे आपल्या कारची बॅटरी चार्ज होण्यास मदत होते. जंप स्टार्ट करुन झाल्यावर लगेच कार बंद करु नये, असे केल्याने बॅटरीला चार्ज व्हायला वेळ मिळत नाही आणि कार पुन्हा बंद होण्याची शक्यता असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com