Car Care In Monsoon : जोरदार पाऊस अन् वादळवाऱ्यात वाहनांना कसे ठेवाल सुरक्षित? या 5 टिप्स फॉलो करा

Should we cover the car in monsoon : आपल्या वाहनांना पावसाळ्यात काहीही होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहीजे.
Car Care In Monsoon
Car Care In MonsoonSaam Tv
Published On

How can I protect my car in monsoon : सध्या हवामान बदलत आहे. यापूर्वीही देशात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हवामान बदलेले पाहायला मिळतेय. लोकांना स्वतःचे आणि त्याचसोबत त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात तुम्ही बऱ्याचदा सरकारी वाहनांन ऐवजी स्वत:च्या वाहनांचा (Vehicle) वापर जास्त प्रमाणात करतो. तसेच आपल्या वाहनांना पावसाळ्यात काहीही होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. तुम्ही कार संबंधित कशी खबरदारी घ्यावी तसेच वादळी हवामानात आणि भर पावसात तुमची कार कशी सुरक्षित ठेवायची ते पाहूयात.

Car Care In Monsoon
Black Car Care Tips| काळ्या रंगाची कार आवडते? खरेदी करताय? हे तोटे बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या

सुरक्षित ठिकाणी पार्क करा

तुम्ही घरी असल्यास, वादळाच्या थेट संपर्कात येण्यापासून कारचे संरक्षण करण्यासाठी गॅरेजसारखे झाकलेले क्षेत्र शोधा. जर तुम्ही गाडी चालवत असाल, तर झाडे (Tree), पॉवर लाईन आणि खांबांपासून दूर एक सुरक्षित पार्किंगची जागा शोधा . कार पार्क करताना, लक्षात ठेवा की त्याच्या आजूबाजूला अशा कोणत्याही गोष्टी नाहीत ज्यामुळे तुमच्या वाहनाला हानी पोहोचू शकते.

हझार्ड फ्लॅश (धोक्याचे दिवे)

वादळ आणि पावसामुळे तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करत असाल तर त्याचा हझार्ड फ्लॅश नक्की वापरा. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्या तुम्हाला ओळखू शकतील. मुसळधार पाऊस आणि वादळामुळे दृश्यमानता कमी होते, त्यामुळे रस्त्यांमध्ये अपघाताचा धोका वाढतो.

Car Care In Monsoon
Car Caring Tips : पावसाळ्यात वाहनाची अशी घ्या काळजी; कारमध्ये उग्र वास जाणवणार नाही

पूरप्रवण क्षेत्र (जेथे पूरस्तिथी निर्माण होऊ शकते) टाळा

मुसळधार पावसात, सखल भागात आणि पूरप्रवण भागात जसे की अंडरपासमध्ये पार्किंग (Parking) टाळा. पुरामुळे तुमच्या कारची इलेक्ट्रिकल सिस्टीम, इंजिन आणि इंटीरिअरला गंभीर नुकसान होऊ शकते . इंजिन बंद पडल्यामुळे किंवा इतर काही बिघाडामुळे तुमची कार तिथे अडकू शकते.

खिडक्या आणि सनरूफ बंद ठेवा

पाऊस किंवा वादळ येण्यापूर्वी कारच्या सर्व खिडक्या, सनरूफ किंवा कन्वर्टिबल टॉप सुरक्षितपणे बंद असल्याची खात्री करून घ्या. हे पावसाचे पाणी तुमच्या कारच्या आतील भागात जाण्यापासून रोखेल आणि पाण्याने होणारे नुकसान टाळेल.

Car Care In Monsoon
Ola Electric Car : ओला कारची डिझाइन लीक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स; टेस्लाला देणार तगडी टक्कर

कार कव्हर वापरा

तुमच्या कारला गॅरेजसारखे झाकलेल्या पार्किंगमध्ये पार्क केल्यास कव्हरचा वापर करणे शक्यतो टाळा तसेच साधारण फक्त छप्पर असलेल्या ठिकाणी पार्क केली असेल तर कव्हर वापरा. गारपीट, अतिवृष्टी आणि इतर हवामानापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले कार कव्हर वापरणे तुमच्या वाहनासाठी फायदेशीर ठरेल. जोरदार वाऱ्यात ते उडू नये म्हणून कव्हर व्यवस्थित बांदले आहे याची खात्री घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com