dealth signs google
लाईफस्टाईल

Death Signs: मृत्यू होण्याच्या २४ तास आधी ही ३ लक्षणे दिसतात; वेदना कमी पण...

Hospice Care: मृत्यूच्या २४ तास आधी रुग्णांमध्ये काही खास शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसतात. वेदना कमी असल्या तरी भीती, भावना आणि कुटुंबाशी संवाद वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक व्यक्तीला माहित असतं की, आपण जेव्हा म्हातारे होतो, तेव्हा आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. पण हा विषय अनेकांना अस्वस्थ करुन टाकणारा आहे. एखाद्या गंभीर आजारामुळे आपल्या मृत्यूला सामोरं जावं लागतं. काहींचा असा समज आहे की, मृत्यू येण्यापूर्वी खूप जास्त वेदना होत असतात. पण एका हॉस्पिस नर्सने याबद्दल एक गंभीर खुलासा केला आहे. पुढे आपण त्या ३ गोष्टींबद्दल जाणून घेणार आहे.

मृत्यूच्या काही तासांआधी रुग्णाला मरणाची भीती असतेच पण त्याच्या जवळचा व्यक्ती गमावण्याची जास्त भीती असते. ही जाणीव जवळपास १० टक्के लोकांना जाणवते. काही लोक मृत्यू येईल असं मानतंच नाही. तज्ज्ञांच्या मते, मरणाची भीती का वाटते? याचं उत्तर अजूनही स्पष्ट झालं नाही. यावर संशोधन सुरु आहे. पण अनेकांना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, संसार, त्यांचे वय यासगळ्याची जास्त भीती वाटते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो.

जेव्हा रुग्णाला कळतं की, त्याच्याकडे फार कमी वेळ आहे. तेव्हा तो त्याच्या कुटुंबाची आणि जवळच्या व्यक्तींची माफी मागतो. त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करतो. काही वेळेस रुग्ण मनातली शंका, इच्छा बोलून दाखवतात.

शेवटच्या दिवसांना सोमोरं जाणाऱ्या रुग्णांच्या मनात राग नसतो. सगळ्या गोष्टी त्या व्यक्त होत असतात. बऱ्याचदा रुग्ण ठरवतात की ते कधी मरणार आहे. त्यांची इच्छा असल्यासारखं ते बोलून दाखवतात. अशी लक्षणं मृत्यूच्या आधी जाणवतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट 2026 परीक्षा अचानक रद्द , विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

Vastu Shastra: सासरच्या मंडळींकडून पुरुषांनी या गोष्टी भेट म्हणून कधीच घेऊ नयेत; आर्थिक परिस्थिती बिघडू शकते

Maharashtra Politics: समाजकारण की राजकारण? बाळासाहेब थोरात अन् चंद्रकांतदादांच्या भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळी नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेला, प्लॅटफॉर्म अन् ट्रेनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT