आधारकार्डावरील मोबाईल नंबर चुकला किंवा बंद आहे? घरबसल्या ५ मिनिटांत करा अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

aadhar card update : आधारकार्डावरील मोबाईल नंबर बदलायचा आहे, तर तुम्ही पाच मिनिटांत करू शकता. जाणून घ्या पद्धत
आधारकार्डावरील मोबाईल नंबर चुकला किंवा बंद आहे? घरबसल्या ५ मिनिटांत करा अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Published On
Summary

आधारकार्डबाबत मोठी अपडेट

आधारकार्डावरील नंबर पाच मिनिटात बदलता येणार

नंबर अपडेट करण्यासाठी जाणून घ्या पद्धत

आधारकार्डावरील मोबाइल नंबर जुना किंवा बंद झाला आहे. त्यामुळे आधारकार्डावरील नंबर अपडेट करायचा आहे. त्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही आता घरबसल्या ५ मिनिटांत अपडेट करू शकता. आधी आधार केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहावे लागत होते. परंतु आता UIDAIच्या आधार अॅपच्या मदतीने मोबाइल नंबर अपडेट करू शकता.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Aadhaar चे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे लागेल. हा अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर आधार नंबरच्या मार्गाने लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर तुमच्या नोंदकृत नंबरवर ओटीपी येईल. ओटीपीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. काही प्रकरणात फेस ऑंथेटिकेशन किंवा इतर व्हेरिफेकशनचा पर्याय उपलब्ध असतो. या प्रक्रिया अधिक सुरक्षित मानली जाते.

आधारकार्डावरील मोबाईल नंबर चुकला किंवा बंद आहे? घरबसल्या ५ मिनिटांत करा अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

लॉगिन केल्यानंतर अॅपच्या होम स्क्रिनवर काही सर्व्हिसेस पाहायला मिळतील. त्यातील Update Mobile Number या सारखा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. त्यानंतर सेक्शनमध्ये जाऊन आधार नंबर कन्फर्म करावा. त्यानंतर मोबाइल नंबरची अपडेटची प्रक्रिया सुरू होईल.

तुम्ही पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला नवीन नंबर नोंदवावा लागेल. तुम्हाला नंबर आधारशी लिंक करायचा असेल, तर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. यातील सर्व प्रक्रिया महत्वाच्या आहेत. यातून तुमचा नंबर योग्य आहे का, हे स्पष्ट होईल.

आधारकार्डावरील मोबाईल नंबर चुकला किंवा बंद आहे? घरबसल्या ५ मिनिटांत करा अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Aadhaar Card Update: तुमचं आधार कार्ड १० वर्ष जुनं झालंय? १४ जूनपर्यंत मोफत करा अपडेट; सोपी प्रोसेस वाचा

सर्व माहिती भरल्यानंतर आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर एक विनंती करावी लागेल. यानंतर काही वेळा किरकोळ शुल्क आकारले जाऊ शकता. तुम्ही विनंती केल्यानंतर तुमची संपर्ण माहिती सिस्टमला अपडेट केली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. त्यानंतर अपडेट रिस्क्वेस्ट नंबर (URN) द्यावा लागतो. तुम्ही मोबाईल नंबर अपडेटचे स्टेटस ट्रॅक करू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागतात. तुम्ही मोबाइल अपडेट झाल्यानंतर एसएमएस द्वारे माहिती मिळते. काही चुका असतील, तर तुमची विनंती फेटाळली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com