Kidney Damage Habits : सावधान! दररोजच्या ५ चुका पडतील महागात, किडनी होईल फेल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Kidney Health: रोजच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीवर ताण येतो. पाणी कमी पिणे, मीठ जास्त खाणे, औषधांचा अति वापर यामुळे किडनी निकामी होऊ शकते, डॉक्टरांनी दिला इशारा.
Kidney Damage Habits
Kidney Fail HabitsGOOGLE
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण मिळेल त्या वेळेत मिळेल ते पदार्थ खात असतो. कितीही नाही म्हंटलं तरी आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा बाहेरचे पदार्थ किंवा जंक फूड खातोच. याने किडनीचं तुमच्या नकळत नुकसान होत असतं. त्यामुळे किडनी तीचं काम सुद्धा करु शकत नाही. यासाठी तुमच्या फक्त खाणंच नाहीतर, तुमच्या इतर सवयीसुद्धा कारणीभूत असतात.

बऱ्याचदा किडनी निकामी होण्याच्या समस्या अनेकांना सामोरं जावं लागतं. त्यामागे रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन आणि व्यसन असे आजार झालेले असतात. पण किडनीवर जेव्हा खूप ताण येतो तेव्हा किडनी निकामी होते. मग ती रक्त शुद्ध करण्याचं काम करत नाही. तसेच शरीरातले टॉक्सिन पदार्थ सुद्धा बाहेर निघत नाहीत. पुढे आपण याला कारणीभूत असणाऱ्या सवयी जाणून घेणार आहोत.

Kidney Damage Habits
Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

सगळ्यात आधी तुम्ही उन्हाळ्यात जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यामुळे तुमच्या किडनीचं कार्य सुधारतं. तसेच किडनीतले विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर निघतात. त्यात वाढत्या उन्हामुळे होणारा डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.

दुसरी सवय म्हणजे तुम्हाला जर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरचा त्रास असेल तर तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण याने किडनीच्या उतींचे (Kidney Tissues) नुकसान होते. म्हणूनच वाढत्या शुगर लेव्हलकडे आणि ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवा.

काहींना जेवणासोबत मीठ जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते. याने ब्लड प्रेशर वाढतं आणि सोडीयम-पोटॅशियमचं संतुलन राखण्यासाठी किडनीला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे किडनीला इजा होऊ शकते.

काहींना दिवसभर कामानिमित्त बाहेर राहावं लागतं, म्हणून ते लघवीला जात नाही. याने मूत्राशयावर आणि मूत्रपिंडावर दाब येतो. याने भविष्यात तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं.

काहींना काही सामान्य आजार झाले की ते मेडिकलमधून गोळ्या विकत घेऊन खात असतात. त्यामुळे किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो आणि किडनी निकामी होऊ शकते. अशा सवयी असल्यास तुमची किडनी निकामी होते. त्यामुळे या चूका आत्ताच करणं टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kidney Damage Habits
High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com