Ladki Bahin Yojana news  Saam tv
लाईफस्टाईल

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana update : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्याचे समोर आलं आहे. जाणून घ्या कारण

Saam Tv

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या प्रत्येक निकषांनुसार पात्र महिलांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० लाख २८ हजार महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत. यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील १४ लाख महिला शेतकरींनी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांचा एकूण १ हजार रुपयांचा लाभ कमी करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबाचा लाभ अडीच लाखांपेक्षा अधिक आहेत. त्या महिलांच्या नावापुढे 'एफएससी' असा शेरा मारून लाभ बंद करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. त्यावेळी सरसकट महिलांना लाभ देण्यात आले. निकष कडक असतानाही अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यामुळी ५ महिन्यांत लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली, त्यानंतर अपात्र लाभार्थींचा शोध घेण्यात आला.

आता १४ हजार २९८ पुरुष लाभार्थी,दोन हजार २८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेतील दोन लाख ३२ हजार महिला, ६५ वर्षांवरील एक लाख १० हजार महिला, एका कुटुंबातील ४ लाख महिला आणि चारचाकी वाहन नावावर असलेल्या सव्वादोन लाख महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळीतून स्पष्ट झाले. तर १ लाख ६० हजार महिलांनी स्वत:हून लाभ नाकारला. नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिला शेतकऱ्यांची नावे देखील लाडकी बहीण योजनेत होत्या.

दरम्यान, राज्यातील १४ हजार २९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आले होते. तर दोन हजार २८९ सरकारी नोकरदार महिलांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे पडताळणीतून समोर आले. अपात्र लाभार्थींनी दरमहा २.४९ कोटींचा लाभ घेतल्याचेही उघडकीस आले. त्यांच्याकडूनही लाभाची रक्कम वसूल होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात पोलिसावरच कोयत्याने हल्ला, ड्युटीवर जाताना गुंडांनी साधला डाव | VIDEO

Gondia : तीन मित्रांचा करुण अंत; शेत तळ्यामध्ये पोहायला गेले असता बुडून मृत्यू

Kalyan Crime : दाल-वड्याला उशीर, कल्याणमध्ये भाईचा इगो हर्ट! लंकेने हॉटेल मालकाला बेदम मारलं अन्...

Maharashtra Live News Update : शेत-तळ्यामध्ये बुडून तीन तरुणांचा मृत्यू, गोंदियातील घटना

SSKTK OTT Release : तुझे लागे ना नजरिया; वरुण-जान्हवीचा रोमँटिक ड्रामा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

SCROLL FOR NEXT