Krishna Janmashtami Saam TV
लाईफस्टाईल

Krishna Janmashtami: श्रीकृष्णाचं आवडतं फळ आहे फार गुणकारी; आरोग्यास मिळतात चमत्कारीक फायदे

Krishna Janmashtami Favourite Fruit : श्रीकृष्णाच्या आवडीची ही फळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहेत. आज आपण याच फळांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. श्रीकृष्णाला विष्णूचा आठवा अवतार म्हणून सुद्धा ओळखलं जातं.

सर्वांसाठी हा सण खास असला तरी कृष्ण भक्तांसाठी हा दिवस खूप मोठा आहे. जन्माष्टमीच्या दिवशी, लोकं उपवास करुन भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात. त्याला पंजिरी, दूध, मेवा, दही यांपासून तयार केलेले सर्व पदार्थ आवडतात. भाविक आपल्या आराध्य दैवताला नैवेद्य अर्पण करण्यासाठी घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. या दिवशी सर्वत्र कान्हाच्या आवडीचे पदार्थ बनले जातात.

श्रीकृष्णाच्या आवडत्या फळांमध्ये विविध फळे येतात. मात्र सर्वात जास्त आवडतं फळ कोणतं असं विचारलं तर ते म्हणजे पेरू. श्रीकृष्णाला पेरू आणि आवळा ही दोन्ही फळे आवडतात. श्रीकृष्णाच्या आवडीची ही फळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहेत. आज आपण याच फळांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

हाडे मजबूत होतात

पेरुमध्ये कॅल्शिम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. पेरुमध्ये मॅग्नेशियम सुद्धा असते. मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो.

मधुमेहासाठी फायदेशीर

पेरुमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. जे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवण्यास मदत करते. त्यामुळे पेरु हे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी सुद्धा फायदेशीर ठरु शकते.

रोगप्रतिकारक शक्ती

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय पेरुमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि ह्रदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर बंदी टाका - राणे

Beauty Tips: चेहऱ्याच्या रंगानुसार निवडा योग्य लिपस्टिक शेड

Ajintha News : 'ये किडे मकोडे मुझे क्या करेंगे..', अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर नाव न घेता टीका

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का, ऐन निवडणुकीत माजी आमदाराने साथ सोडली

Sharad Pawar Exclusive : अदानींवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट, शरद पवारांनी एका झटक्यात विषय संपवला; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT