Krishna Janmashtami 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त काय? कान्हाला दाखवा खास नैवेद्य, पटकन नोट करा रेसिपी

Panjiri Recipe : अवघ्या काही दिवसांवर गोकुळाष्टमी आली आहे. कृष्ण जन्मोत्सव निमित्त देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वादिष्ट पदार्थ घरी नक्की बनवा.

Shreya Maskar

श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक सण येतात. यंदा कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट रोजी आली असून २७ ऑगस्टला दही हंडीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक अनेकजण दिवसभर उपवास करून श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होतात. कृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक केला जातो. अभिषेक करताना कृष्णाच्या मंत्राचा जप केला जातो. तसेच या दिवशी सर्वात महत्त्वाचे श्रीकृष्णांना पाळण्यात घातले जाते.

शुभ मुहूर्त

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २०२४ ला रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

पंजिरी

साहित्य

कृती

पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कापलेला सुकामेवा छान परतून घ्यावा. तसेच त्याच पॅनमध्ये पुन्हा तूप टाकून मखाना भाजून घ्यावा. आता दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात धणे पावडर गोल्डन फ्राय करून घ्या. ही पावडर छान भाजली की, गॅस बंद करा. आता यात भाजलेले मखाना, वेलची पावडर, साखर पावडर आणि सुकामेवा घालून सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्या. यानंतर हे मिश्रण मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे हलके परतून घ्या. अशा प्रकारे स्वादिष्ट पंजिरी तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT