Kolhapuri Chappal google
लाईफस्टाईल

Kolhapuri Chappal : प्राडाचे सदस्य थक्क! कोल्हापुरी चपलांचे विविध प्रकार पाहून दिली खास दाद

Kolhapur Sandals Impress Fashion Giants : प्राडा प्रतिनिधींनी कोल्हापुरातील चप्पल दुकाने पाहून कोल्हापुरी चपलांचे कौतुक केले. पारंपरिक चपलांचा जागतिक स्तरावर सन्मान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य वापरत असतीलच. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. कोल्हापुरी चपला या चमड्याचा आणि हाताने तयार केलेल्या असतात. याच चपलांची नकल करुन अनेक चपला बाजारात सहज विकल्या जातात. मात्र आता ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरी चपला प्राडाच्या फॅशन शोमध्ये वापरली आहे.

दरम्यान कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ प्राडाच्या माध्यमातून उपलब्ध होईल असा विश्वास अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे. प्राडाच्या सहा सदस्यांनी आज सकाळी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधला. तसेच कोल्हापुरी चपलांचे विविध प्रकार बघून प्राडाचे सदस्य अक्षरशः थक्क झाले. कोल्हापुरी चपलेचे एवढे प्रकार असतात हे प्राडाच्या सदस्यांनी पहिल्यांदाच समजलं.

तसंच प्राडाच्या फॅशन शोमध्ये वापरली गेलेली चप्पल ही कोल्हापुरीच असल्यास देखील आता स्पष्ट झाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या समवेत कोल्हापुरी चपलांची चपलांच्या दुकानांची पाहणी करत सदस्यांनी ही माहिती घेतली आहे. प्राडाच्या तज्ञ समितीने आज कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल लाईनची पाहणी केली आणि चप्पल विक्रीची माहिती घेतली. यावेळी कोल्हापुरातील दुकानांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला पाहून तज्ञ समितीने आश्चर्य व्यक्त केले.

यावेळी चप्पल व्यापाऱ्यांनी त्यांना काही चपला भेट म्हणून देखील दिल्या. महाराष्ट्रातील कोल्हापुर शहर तसेच सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकमध्ये कोल्हापुरी चपला या खूप मेहनीचे हाताने तयार केल्या जातात. त्यामध्ये खिळे किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात नाहीत.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री म्हणाले जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, ठाकरेंच्या खासदाराकडून सडेतोड उत्तर

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

India National Food: भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? ९९% लोकांना माहित नसेल

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

SCROLL FOR NEXT