Sakshi Sunil Jadhav
आपली मानसिकता जपावी लागेल. डोक्यावर बर्फ जिभेवर साखर ठेवा. आर्थिक चणचण सुध्दा सहन करावी लागेल.
वाहनांशी निगडित आज विशेष काळजी घ्यावी लागेल. काही अडचणी किंवा त्रास या संदर्भात उद्भवू शकतात.
प्रेमामध्ये अपयश मिळण्याचा संभाव आहे. कामाच्या ठिकाणी मात्र भरभराट दिसते आहे. ठरवाल ते करेनच असा "निश्चयाचा महामेरू" असणारा तुमचा आजचा दिवस आहे.
प्रेमापोटी केलेली आणि जपलेली नाती असतात. आज त्यातील संबंध वृद्धिंगत होतील.
माहिती करूनच एखादा व्यवहार करावा. खूप मोठं मोठी आव्हाने आजच्या दिवसात घ्यायला नको.
बौद्धिक गोष्टीमध्ये आगेकुछ होईल. व्यापाराशी निगडित महत्त्वाचे निर्णय आज योग्य ठरतील.
थोड्या तब्येतीच्या तक्रारी आज दिसत आहेत. जुन्या गोष्टी विसरून आज चालणार नाही. कदाचित गुप्त शत्रू चाल करून येतील.
कुलस्वामिनी उपासना आज फलदायी ठरेल. ठरवाल ते करूच असा ध्यास आज घेऊन जगाल. दिवस चांगला आहे.
मोठे प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार घडतील. जुन्या नव्याचं मिलन होईल. दिवस आशादायी आहे.
पराक्रमाला नवे पंख फुटतील. न बोलता अनेक कामे सहज करून जाल. कष्टाला मात्र आज पर्याय राहणार नाही.
धनाची आवक जावक चांगली राहील. गुंतवणुकीतून फायदा आहे. संशोधनात्मक कार्यात यश मिळेल.
माझे माझ्यातले असणे शोधण्यात आज दिवस व्यस्त राहील. सुखाच्या प्राप्तीसाठी धडपड कराल. सकारात्मक होऊन जगाल.