संधिवात हा कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीला प्रभावित करू शकतो. संधिवात हा केवळ एक आजार नसून यामुळे सांध्यांमध्ये सूज येऊन सांध्यांचं नुकसान होतं. त्यामुळे वेदना, स्नायुंचा कडकपणा, सूज आणि हालचाल करण्यात अडचण येते. ही लक्षणे एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात व्यत्यय आणतात.
नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील आर्थ्रोस्कोपिक सर्जन आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. शरीफ दुदेकुला यांनी सांगितलं की, जरी अनेक प्रकारच्या संधिवातांवर कोणताही उपचार नसला तरी अस्वस्थता कमी करण्यासाठी, तुमच्या सांध्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. संधिवाताबद्दल अजूनही जागरूकतेचा अभाव आहे आणि बऱ्याच व्यक्ती त्वरित उपचारास विलंब करतात. संधिवात बद्दल तुम्हाला माहित असायला हव्या असलेल्या पाच गोष्टी याठिकाणी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
संधिवाताचे १०० हून अधिक प्रकार आढळून येतात. दोन सामान्यपणे आढळून येणारे प्रकार म्हणजे ऑस्टियोआर्थरायटिस आणि रूमेटाइड अर्थराइटिस (एक स्वयंप्रतिकार स्थिती).
संधिवात पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य काळजी व वेळीच उपचाराने आजाराच्या व्यवस्थापनात मदत होते. हे सिद्ध झाले आहे की संधिवात सहसा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु जर त्याचे वेळीच निदान झालं तर उपचारांमुळे त्याची प्रगती मंदावते आणि लक्षणं कमी होतात. रुग्णाला या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावं लागेल, फिजिओथेरपीचा पर्याय निवडावा लागेल आणि फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा लागेल.
हलका व्यायाम, स्ट्रेचिंग, चालणं किंवा पोहणं हे सांधे लवचिक आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात. तर एकाच ठिकाणी खुप वेळ बसुन राहणे किंवा जास्त विश्रांती घेतल्याने स्नायुंमध्ये कडकपणा जाणवू शकतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करणे योग्य राहील.
वजन नियंत्रित राखणं आणि संतुलित आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. विविध अभ्यासांनुसार, शरीराचा जास्तीचा भार हा सांध्यांवर येतो, विशेषतः गुडघे, कंबर आणि मणक्यावर याचा जास्त दबाव आणते. पूरक आहाराने सांध्यावरील ताण कमी करण्यास मदत होते.
बर्फाने शेकवल्यास सांध्यांची सूज कमी होते. गरम कपड्याने शेकवल्यास अथवा पाण्यात पाय बुडवल्यास सांध्यांना पुरेसा आराम मिळतो आणि रक्त प्रवाह चांगला राखण्यास मदत होते. हॅाट ॲण्ड कोल्ड थेरेपीने वेदना कमी होतात आणि अस्वस्थता दूर होऊ शकते. या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तज्ञांच्या मदतीने संधिवाताचे वेळीच व्यवस्थापन करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.