Cockroach In Coffee: तुम्ही झुरळ असलेली कॉफी पिताय का, तुमच्या आरोग्याला किती आहे धोका? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

Cockroaches in coffee viral video: कॉफीचा कप खरंच तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे का? सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, आपण पीत असलेल्या ग्राउंड किंवा इन्स्टंट कॉफीमध्ये झुरळांचे आणि इतर कीटकांचे कण असू शकतात.
Cockroaches in coffee viral video
Cockroaches in coffee viral videosaam tv
Published On

आपल्यापैकी अनेकजण हे कॉफीचे चाहते असतील. काहींचा दिवसही कॉफीशिवाय सुरु होत नाही. कॉफी ही जगभरात सर्वाधिक प्यायलं जाणाऱ्या ड्रिंकपैकी एक आहे. सकाळची सुरुवात, ऑफिसमध्ये काम करताना किंवा मित्रांबरोबर कॉफी डेट हे आपल्या लाइफस्टाइलचा एक महत्त्वाचा भाग बनलीये. मात्र याच कॉफीसोबत एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय.

सोशल मीडियावरचा व्हायरल दावा

नुकतंच सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय की, कॉफीमध्ये १०% पर्यंत कॉकरोच म्हणजेच झुरळाचे छोटे अवशेष असू शकतात. व्हिडिओमध्ये असंही म्हटलंय, की हे FDA च्या नियमांनुसार सुरक्षित आहे.

Cockroaches in coffee viral video
Eye cancer symptoms: डोळ्यांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय; पाहा डोळ्यांमध्ये गाठी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

FDA चं मत काय आहे?

अमेरिकेच्या FDA नुसार, कॉफीमध्ये छोट्या कीटकाचे अवशेष असणं सामान्य आहे. जर हे अवशेष मानक मर्यादेच्या आत असतील, तर ते खाद्यसुरक्षेसाठी स्वीकार्य आहेत. मुळात कॉफी बीन्सच्या साठवणूक आणि पॅकेजिंगच्या प्रक्रियेदरम्यान छोट्या कीटकांचे अवशेष सहज मिसळू शकतात. यावेळी त्यांना कॉफीतून पूर्णपणे काढून टाकणं फारच कठीण असतं. म्हणून हा प्रकार सामान्य मानला जातो.

१०% पर्यंत अवशेष म्हणजे काय?

काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कॉफीमध्ये १०% पर्यंत झुरळाचे अवशेष असू शकतात. तरीही, हे प्रमाण FDAच्या नियमांमध्ये येतं, त्यामुळे ते सुरक्षित आहे.

Cockroaches in coffee viral video
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

सोशल मीडियावर पसरलेली अफवा की सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब तुम्ही हादरवणारी वाटू शकते. मात्र तज्ज्ञ सांगतात की, छोटे अवशेष आरोग्यास धोका पोहोचवत नाहीत. मुख्य म्हणजे उद्योगामध्ये हे सामान्य मानलं जातं.

Cockroaches in coffee viral video
Early stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर असल्यास केवळ सकाळच्याच वेळी शरीरात होतात हे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

पॅक्ड कॉफी आणि ग्राउंड कॉफीतील फरक काय?

कॉफी बीन्ससह येणाऱ्या कॉफीमध्ये हे अवशेष कमी आढळतात. तर ग्राउंड किंवा इंस्टंट कॉफीमध्ये याचं प्रमाण अधिक दिसू शकतं. उत्पादन प्रक्रियेमध्ये कीटक अवशेष मिसळू शकतात, म्हणून फरक असतो. मुळात आपण कॉफीची खरेदी करताना हे समजून घेतलं पाहिजे की, कॉफीमध्ये छोटे कीटक अवशेष असणं सामान्य आहे. योग्य सुरक्षा उपाय आणि नियमांनुसार हे आरोग्यासाठी हानिकारक नाहीत.

Cockroaches in coffee viral video
Stomach cancer:तुमच्या शरीरात दिसून येणारे 'हे' संकेत आहेत पोटाच्या कॅन्सरचे; ट्यूमर तयार होण्यापूर्वी दिसतात बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com