Grain Storage Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Grain Storage Tips : पावसाळ्यात धान्याला किड लागली? फॉलो करा 'या' टिप्स, बुरशीची समस्या होईल दूर

Grain Storage Tips In Monsoon : पावसात आरोग्यासोबत खाण्यापिण्याच्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसात धान्याला किड आणि बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसात धान्यांची विशेष काळजी घ्यावी.

Shreya Maskar

अनेकांना पावसाळा आवडतो, परंतु पावसातील थंड वातावरणामुळे हवेत आर्द्रता निमार्ण होते. या वातावरणात धान्य साठवून ठेवल्यास ते खराब होते. पावसातील ओल्या वातावरणामुळे धान्यांना बुरशी लागून किडे पडण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पावसात बरेच अन्न वाया जाते. त्यामुळे पावसात धान्यांची विशेष काळजी घ्यावी.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • धान्यांवर कीटकनाशक कधीही मारू नये. कारण आरोग्यास ते घातक ठरते.

  • पावसात धान्य खरेदी करताना त्यांचा दर्जा चांगला असेल याची खात्री करून घ्या.

  • पावसात घरातओलावा निर्माण होतो. त्यामुळे घरी धान्य ठेवण्याच्या जागी ओलावा असणार नाही याची काळजी घ्यावी.

  • पावसात ऊन खूप कमी असते. पण जेव्हा केव्हा ऊन असेल तेव्हा धान्य उन्हात वाळवा .

  • धान्य वाळवण्यासाठी तुम्ही पंख्याचा वापर करू शकता.

  • धान्य कधीही हवाबंद डब्यामध्ये स्टोर करावे. यामुळे धान्याला वास येत नाही आणि धान्य दीर्घकाळ टिकते.

  • पावसात धान्य जमिनीवर ठेवू नये. नेहमी धान्य उंचावर ठेवावे.

सर्वात महत्वाचे पावसात जास्त प्रमाणात धान्य साठवू नये आणि साठवायचे असल्यास 'या' गोष्टींची काळजी घ्यावी.

  • पावसात धान्य साठवणाऱ्या डब्यांमध्ये धान्यांना किड लागू नये म्हणून त्यामध्ये लवंग, तमालपत्र, मोहरी, लसूण , कडुनिंबाची पानं टाकावी.

  • हळद : एका मऊ कपड्यामध्ये हळद घालून त्याची पोटली धान्यांच्या डब्यामध्ये ठेवून द्या. त्यामुळे धान्यांला किड लागत नाही. कारण हळदीचा वास तीव्र असतो.

  • मोहरी : पावसात धान्यांना किड लागल्यास थोडेसे मोहरीचे तेल त्यात मिसळा आणि उन्हामध्ये वाळवा.

  • लसूण : लसूण सालीसकट धान्यांमध्ये टाकावी. त्यामुळे धान्याला आलेली बुरशी निघून जाते.

  • कडुलिंबाची पाने : कडुलिंबाची पाने धान्याला लागलेली किड आणि बुरशीसाठी रामबाण उपाय आहे. कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म आहेत. वाळलेली कडुलिंबाची पाने धान्यांच्या डब्यामध्ये टाकावी.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT