Gondia News : कोट्यवधींच्या धान्याला फुटले अंकुर; शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

Gondia News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादीत केलेले धान्य खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांचा धान्य खरेदी करावे
Gondia News
Gondia NewsSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: खरीप हंगामात खरेदी केलेले धान्य गोदामात पडून आहे. पावसामुळे ते भिजल्याने त्याला अंकुर फुटले आहेत. तसेच (Gondia) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादीत केलेले धान्य खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करावे. या मागणीसाठी देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन याना निवेदन देत विनंती केली आहे.

Gondia News
Nashik News : ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख घेतले; सुटीवर असताना महिला अधिकाऱ्याने लाच घेतल्यानं गुन्हा

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान पीक निघून पंधरा दिवसाच्यावर कालावधी लोटला आहे. जिल्ह्यात अद्यापही शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना धान्य विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे; अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmer) केली आहे.

Gondia News
Dharangaon News : पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक; नजर चुकवत दागिने केले लंपास

गोदामातील धान्याला फुटले अंकुर 
शिवाय खरीप हंगामात (Kharip Hangam) आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला १० लक्ष क्विंटल धान्य तसेच जिल्हा मार्केटींग फेडरेशनने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला २५ लक्ष क्विंटल धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे खरेदी केलेले धान्य पाण्याने भिजत असून त्याला अंकुर आल्याने संस्था चालकांचे नुकसान होत आहे. खरेदी केलेल्या धान्याची भरडाई लवकरात लवकर करावी अशी मागणी देखील आमदार कोरोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com