Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Gondia News : गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०२३-२४ या काळात जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यात १ लक्ष २५ हजार १२९ शेतकऱ्यांनी धान्य विक्री करिता ऑनलाईन नोंदणी केली.
Gondia News
Gondia NewsSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात १८३ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावरून खरेदी केलेलय ५४१ कोटी रुपयाचा धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेने आपल्या विविध मागण्यासाठी धान्य भरडाई बंद ठेवली आहे. यामुळे धान्य पडून आहे. 

Gondia News
Water Shortage : मराठवाड्यात तीव्र टंचाई; टँकरची संख्या वाढून पोहचली १४०० च्या वर

गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०२३-२४ या काळात जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यात १ लक्ष २५ हजार १२९ शेतकऱ्यांनी धान्य विक्री करिता ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ८० हजार ८०६ शेतकऱ्यांनी (Farmer) शासकीय धान्य खरेदी केंद्रावर २४ लक्ष ७७ हजार ९९६ क्विंटल धान्य विक्री केली असून या धान्याचे ५४० कोटी ९४ लक्ष ५३ हजार ७६ रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. खरेदी केलेला धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यातील ३५३ राईस मिलर्स पैकी १९६ राईस मिलर्सने धान्य भरडाई करण्यासाठी करार फॉर्मची उचल केली होती. त्यापैकी ३३ राईस मिलर्सने धान्य भरडाईचा करार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे केला असून सुद्धा धान्य भरडाईला सुरवात केली नाही. 

Gondia News
Boycott Election : मेणबत्ती पेटवत मतदान न करण्याची घेतली शपथ; कळमदरी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

दरम्यान पणन विभागाने १५ एप्रिलला गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सोबत मिटिंग घेत धान्य भरडाई करण्याची विनंती केली. मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्यावर अडून असल्याने धान्य भरडाईचा मार्ग निघाला नाही. यात १५० रुपये क्विंटल प्रमाणे भरडाई दर द्यावे. हमाली दर वाढवून द्यावे, वाहतूक दरात वाढ करावी. यासह अन्य मागण्यांना घेऊन राईस मिलर्स धान्य भरडाई करण्यात तयार असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही; तॊ पर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिलर्सने घेतला आहे. तर २ मे पर्यंत करार केलेल्या ३३ राईस मिलर्सने धान्य भरडाईला सुरवात केली नाही.अशा राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांचे करार नामे देखील रद्द करणे EMD जपत करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाने पणन विभागाला दिल्या आहेत. तर दुसरीकडे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही; तो पर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिल मालकांनी घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com