छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असून दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. (Sambhajinagar) मराठवाड्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या वाढत जाऊन आता मे महिन्याच्या सुरुवातीला ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
यंदा कमी पाऊस (Rain) झाल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. यामुळे अगदी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात मराठवाड्यात (Marathwada) पाण्याची टंचाई अधिक असून एप्रिल महिन्यानंतर टँकरच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. १२ लाख ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना पर्याय नसून टँकर वेळेत गेले नाहीत, तर त्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.
एकीकडे निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे मराठवाडा दुष्काळी स्थिती असे चित्र सध्या आहे. जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९ तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च महिन्यात टँकरची संख्या ४३५ वर पोहोचली. एप्रिल महिन्यात मराठवाड्यात टँकरची संख्या १४२४ वर पोहोचली आहे. आता त्यात आणखी वाढ होत आहे.
मराठवाड्यातील टँकरची स्थिती
छत्रपती संभाजीनगर ५६९, जालना ४१८, परभणी ५, नांदेड १५, बीड ३०२, लातूर १३, धाराशिव १०२
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.