Food Poisoning SAAM TV
लाईफस्टाईल

Food Poisoning : पावसाळ्यात होणार्‍या फूड पॉयझनिंगवर घरगुती रामबाण उपाय, मिनिटात पोटाला मिळेल आराम

Food Poisoning Home Remedies : पावसाळ्यात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त वाढते. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. फूड पॉयझनिंग झाल्यावर 'हे' घरगुती उपाय करा आणि आरोग्य जपा.

Shreya Maskar

पावसात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. पावसाळ्यात बाहेरचे दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका वाढतो. फूड पॉयझनिंगमुळे उलट्या, डायरिया, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पावसाळ्यात होणार्‍या फूड पॉयझनिंगवर हे घरगुती रामबाण उपाय करावे. यामुळे काही वेळातच पोटाला आराम मिळेल.

ॲपल सायडर व्हिनेगर

गरम पाण्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर टाकून प्यायल्यास फूड पॉयझनिंग झाल्यास आराम मिळतो.

लिंबू

दिवसातून दोन वेळा कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस घालून थोडीशी साखर आणि काळे मीठ घाला. छान ढवळून घ्या. या पाण्याचे सेवन दिवसातून दोन वेळा करा. यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळेल.

दही

फूड पॉयझनिंगमध्ये पोटदुखी वाढते. अशात पोटाला थंडावा देणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे थंड दही मध्ये मेथी दाणे टाकून खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

आले आणि मध

आयुर्वेदात आले आणि मधाला औषधी महत्व आहे. आल्यामध्ये दाखल विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील संसर्ग बाहेर टाकण्यास मदत करतात. मधामध्ये आल्याचा रस मिसळून हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा घ्या. त्यामुळे पचनाची समस्या दूर होईल आणि पोटाला आराम मिळेल.

जिरे

भाजलेले जिरे फूड पॉयझनिंगवर रामबाण उपाय आहे. पोटात झालेली आग शांत करण्यासाठी भाजलेले जिरे खावे. पावसाळ्यात गरमागरम सूप पिताना त्यावर जिरे पावडर टाकून प्यावे.

तुळशीची पाने

फूड पॉयझनिंगवर तुळशीची पाने हा सर्वोतम उपाय आहे. आयुर्वेदात तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीच्या पानांचा रस बनवून त्यामध्ये मध घालून नियमित एक चमचा खा.पोटासंबंधित कोणतेच आजार होणार नाही.

केळ

फूड पॉयझनिंग झाल्यावर जसा पोटाला थंडावा मिळणे गरजेचे असते. तसेच पौष्टिक आहार खाणे ही महत्वाचे आहे. त्यामुळे दह्यामध्ये केळी मॅश करून नाश्त्याला खाल्ल्यास दिवसभर पोट भरलेले राहते. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

डाळिंब

रसाळ डाळिंब्याचा रस काढून त्यामध्ये पुदिन्याची पाने टाकून पोटाच्या सर्व समस्या दूर होऊन आराम मिळतो.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT