Jaggery Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Jaggery Benefits: दररोज आवर्जून खावा गूळ, आरोग्याला होतील ९ मोठे फायदे, तुम्हाला याबद्दल माहितीये का?

Jaggery Benefits in Marathi: आपण दररोज पाहत असतो की आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा मात्र जर तुम्ही आहारात गुळाचे सेवन केल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरती इंगळे- साम टीव्ही

ऋतुमानानुसार आहार हे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.विविध सणांमुळे आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केलेला आढळतो.आता पावसाच्या दिवसात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. नेहमीच गुळाचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी आणि फायदेशीर ठरते. उसापासून तयार होणाऱ्या गुळात अनेक औषधी आणि आरोग्यदायी तत्व आढळून येतात.

पावसात गुळ खाल्ल्याने पचनक्रिया (digestion)सुधारते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच वजन नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर गुळ हा गरम असल्याने तो पावसात शरीराला आतून गरम ठेवण्यास मदत करतो. गुळातील कॅल्शियममुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करू शकते आणि कावीळ सारख्या रोगांचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते.

गुळाचे आरोग्यावर होणारे 9 फायदे

1) गुळाने शरीर(Body) आतून गरम राहते

2) रोग प्रतिकारक क्षमता वाढते

3) बद्धकोष्टतेचा त्रास दुर होऊन पाचनक्रिया सुधारते

4) गुडघे, सांधे, खांदे आणि हाडांमधील दुखणे थांबते

5) शरीराचे आतून शुद्धीकरण होते

6) मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होतो

7) गुळात(jaggery) आर्यन मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे एनीमिया आजारापासून तुमचा बचाव होतो

8) पोटाच्या समस्या दूर करून वजन कमी करण्यास मदत होते

9) श्वसनाच्या आजारापासून मुक्तता मिळते

थोडक्यात, गूळ तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. ऊर्जा वाढवण्यापासून ते पाचन समस्या सोडवण्यापर्यंत.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT