Bihar Places SAAM TV
लाईफस्टाईल

Bihar Places To Visit: 'बिहार'च्या कला आणि संस्कृतीचा जवळून अनुभवा घ्या, सुट्टीत 'या' ठिकाणांना भेट द्या...

Must Visit Places in Bihar: भारतातील बिहार राज्यातील 'या' पर्यटन स्थळांना सुट्टीत आवर्जून भेट द्या आणि बिहारची संस्कृती जवळून अनुभवा.

Shreya Maskar

सुट्टीमध्ये कोणत्या नवीन ठिकाणाला भेट देऊन तेथील संस्कृती आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर, बिहार या शहराला नक्की भेट द्या. बिहार शहर विविधतेने नटलेले पाहायला मिळेल. वास्तुकला आणि शिल्पकाला हे बिहारचे आकर्षण आहे. याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात. बिहार हे प्राचीन काळी 'मगध' या नावाने ओळखले जायचे. बिहार हे राज्य नेपाळ, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी वेढलेले आहे.

चला तर मग या संस्कृतीने नटलेल्या बिहार शहरातील पर्यटन स्थळे जाणून घेऊयात...

नवलखा पॅलेस

नवलखा पॅलेस बिहारमधील पर्यटनाचे आकर्षण आहे. येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. नवलखा पॅलेस महाराज रामेश्वर सिंह यांनी बांधला आहे.

मुझफ्फरपूर

मुझफ्फरपूर हे लिचीसाठी प्रसिद्ध आहे. मुझफ्फरपूर हे बागमती आणि लखनदेई नद्यांच्या जवळ आहे. बिहारला आल्यावर पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

हाजीपूर

हाजीपूर हे हिंदू आणि जैन धर्मांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे आल्यावर पर्यटक गांधी सेतूला आवर्जून भेट देतात.

सीतामढी

सीतामढी हे सीतेचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जानकी स्थान मंदिर हे सीतामढीचे आकर्षण आहे.

मधुबनी

मधुबनी शहर जगभरात मधुबनी पेंटिंगसाठी ओळखले जाते. मिथिला संस्कृतीचा मधुबनी मुख्य भाग आहे.

राजगीर

राजगीर हे बिहारमधील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. हे शहर सुंदर धबधबे आणि लेणींसाठी प्रसिद्ध आहे. भगवान बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपल्या जीवनाचा बराच काळ या शहरात घालवला आहे.

पावापुरी

पावापुरी हे ठिकाण आपापुरी म्हणून ओळखले जाते. पावापुरीचे जलमंदिर पर्यटनांचे आकर्षण आहे. पावापुरी हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे.

बोधगया

बोधगया हे बिहारमधील बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी प्रसिद्ध आहे. बिहारला आल्यावर पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

वैशाली

बिहारमधील वैशाली येथे भगवान महावीर यांचा जन्म झाला. या शहराचे नाव राजा विशालच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

Stampede Safety Tips : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

SCROLL FOR NEXT