kokan tourist places: फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील ‘ही’ पर्यटन स्थळे

Tourist Places: दरवर्षी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोकणात समुद्रकिनाऱ्यापासून अनेक ठिकाणी तुम्ही कुटुंबियासोबत जाऊ शकता.
Tourist Places
konkan tourist placesSaam Tv
Published On

जेव्हा कुटुंबात फिरायला जाण्याचा प्लॅन करतात,तेव्हा प्रत्येकजण एकाच ठिकाणच नाव घेतात. ते ठिकाण म्हणजे कोकण. कोकण त्याच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा सोडून कोकणात अनेक पर्यटन स्थळे आहेत. कोकणात फिरायला जाणे म्हणजे एक आगळी- वेगळी पर्वणीच असते.

Tourist Places
Healthy Lifestyle : निरोगी जीवन जगण्यासाठी आजच 'हे' 5 बदल करा !

कोकणाला महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया असेही म्हटले जाते. हिरवा गार परिसर आणि निळाशार समु्द्र म्हणजे कोकण. दरवर्षी लाखो पर्यटक कोकणात सहलीसाठी येत असतात. बहुतेकजण पावसाळ्याच्या दिवसात कोकणात(Kokan) पर्यटनासाठी येण्याचे प्रमाण जास्त असते. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना कोकण आपलासा वाटतो. जर तुम्हीही कोकणात फिरायला येण्याचा विचार करताय? तर या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

दापोली

कोकणातील प्रसिद्ध असे एक ठिकाण म्हणजे दापोलीचा समुद्र किनारा. मुंबई शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर दापोली आहे. गेल्या काही वर्षात दापोली समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे.या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला एस.टी बसही उपलब्ध आहेत तसेच तुम्ही खाजगी वाहन घेऊनही जाऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला अनेक वॉटर स्पोर्ट्सचा (water sports)आनंदही घेता येईल.

कशेळी,कनकादित्य मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यात एक कशेळी नावाचे गाव स्थित आहे. या गावात प्रसिद्ध असे कनकादित्य मंदिर आहे. आपल्या भारतात सूर्याची फक्त सात मंदिरे आहेत. त्यापैकी एक असलेले मंदिर हे कशेळी गावातील कनकादित्य. जगभरात या मंदिरला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या मंदिरात पोहचण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रिक्षा असतात.

तारकर्ली

तारकर्ली समुद्र किनारा पर्यटकसांठी कामय प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग तसेच अन्य वॉटर स्पोर्ट्सचा अ‍ॅक्टिव्हीटीही पर्यटकांना करता येतात. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला मडगाव रेल्वे स्थानकावरून एस.टी.बसेस किंवा रिक्षा उपलब्ध आहेत.

श्रीवर्धन

श्रीवर्धनचा समुद्रकिनारा जगभर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एक सोमजाई मंदिर आहे जे तब्बल २००ते २५० वर्षापूर्वीचे आहे. जर कोकण फिरायचा तुम्हाचा विचार असल्यास श्रीवर्धनला नक्की भेट द्या.

थिबा राजवाडा

कोकणात फिरण्यासाठी फक्त समुद्रकिनाराच प्रसिद्ध नाही तर अनेक ठिकाणे आहे. त्यातील एक ठिकाण म्हणजे थिबा राजवाडा. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा आहे. या राजवाड्यात अनेक पुरातन गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रिक्षा उपलद्ध असतात.

Tourist Places
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com